Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»पाकिस्तान पुन्हा हादरला.. भूकंपाचा तीव्र धक्का
    ब्रेकिंग

    पाकिस्तान पुन्हा हादरला.. भूकंपाचा तीव्र धक्का

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 12, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पाकिस्तानच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एकीकडे भारत आणि पाकिस्तानात युद्धसदृश्य परिस्थिती अन् दुसरीकडे निसर्गाचा कोप.. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याची तीव्रता ४.६ रिस्टेल स्केल इतकी होती. गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानमध्ये तिसऱ्यांदा भूकंप आला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 4.6 रिस्टेल स्केल इतकी होती. तर खोली 10 किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या एका आठवड्यात पाकिस्तानमध्ये तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. यापूर्वी सोमवारी (5 मे) पाकिस्तानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 4.2 इतकी नोंदवण्यात आली होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, हा भूकंप जमिनीपासून केवळ 10 किलोमीटरवर झाला होता. त्यामुळे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते.

    https://x.com/NCS_Earthquake/status/1921843509767926172

    पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भूकंप येत आहेत. हे सर्व भूकंप 70 किलोमीटरपेक्षा कमी खोल होते. त्यामुळे या भूकंपामुळे अधिक प्रमाणात नुकसान होते. जमिनीपासून केवळ १० किलोमीटर खाली भूकंपीय लहरी जाणवतात. त्यामुळे भूकंपाचे केंद्र बिंदू असलेल्या ठिकाणी तीव्र कंपने जाणवतात. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते.

    पाकिस्तानातील बलुचिस्तान हे एक केंद्रशासित क्षेत्र आहे. खैबर पख्तूनख्वा आणि गिलगिट-बाल्टिस्तान हे प्रांत इराणी पठारावरील युरेशियन प्लेटच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर वसलेले आहेत. तर सिंध, पंजाब आणि पाकिस्तानच्या ताब्यात असलेला जम्मू आणि काश्मीर प्रांत दक्षिण आशियामध्ये भारतीय प्लेटच्या उत्तर-पश्चिम टोकाला आहे. यामुळे, हा संपूर्ण प्रदेश भूकंपांसाठी संवेदनशील मानला जातो. कारण येथे दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना धडकतात.

     

     

    Pakistan earthquake
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    हिमाचल प्रदेशसह जम्मू काश्मीर मध्ये महाभयंकर तांडव!

    July 19, 2026

    श्वान निर्बिजीकरण प्रकल्पात डीव्हीडी अट कागदावरच?

    July 14, 2026

    अंध आईचा मृत्यूचा सापळ्यातून बचाव!

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif