Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    • शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»धुलाई केल्यानंतर पाकिस्तानची पुन्हा तक्रार
    ताज्या बातम्या

    धुलाई केल्यानंतर पाकिस्तानची पुन्हा तक्रार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 23, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दुबई : आशिया कप 2025 च्या सुपर फोरमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सलामीवीर फखर झमानच्या वादग्रस्त बाद निर्णयाबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
    सामन्याच्या तिसऱ्या षटकात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर फखर झमानने फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या कडेला लागून यष्टिरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. सॅमसनने पुढे झुकून हा झेल घेतला. ऑन-फिल्ड अंपायरने हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे सोपवला, कारण चेंडू जमिनीला लागून सॅमसनच्या हातात गेला की नाही, याबाबत संशय होता. अनेक रिप्ले आणि विविध कोनातून तपासणी केल्यानंतर तिसऱ्या अंपायरने फखरला बाद घोषित केले.

    या निर्णयामुळे फखर झमान आणि पाकिस्तानचे संघ व्यवस्थापन दोघेही नाराज झाले. त्यांना असे वाटले की, चेंडू जमिनीला लागल्यानंतर सॅमसनच्या हातात गेला होता, त्यामुळे तो ‘नाबाद’ असायला हवा होता. पाकिस्तानच्या कर्णधार सलमान अली आगाने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
    पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून तिसऱ्या अंपायरच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. पीसीबीच्या मते, तिसऱ्या अंपायरने उपलब्ध असलेल्या सर्व कोनांमधून तपासणी न करता घाईत निर्णय दिला. त्यांचा दावा आहे की, हा निर्णय चुकीचा होता आणि यामुळे सामन्यावर परिणाम झाला. पीसीबीने यापूर्वीही आशिया कपमधील ‘हँडशेक’ न केल्याच्या मुद्द्यावरून आयसीसीकडे तक्रार केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif