पाकिस्तानमध्ये सियालकोट लष्करी तळावर भीषण स्फोट; परिसरात धुराचे लोट

0

लोकशाही न्युज नेटवर्क

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या उत्तरेकडील सियालकोट शहरात भीषण स्फोट झाला आहे.सलग झालेल्‍या स्‍फोटांमध्‍ये हा संपूर्ण परिसर हादरला आहे . उत्तर पाकिस्तानातील सियालकोटमधील (Pakistan Sialkot Military Base) लष्करी तळावर साखळी बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. पंजाब प्रांतातील कॅन्टोन्मेंट परिसराजवळ या स्फोटांचा आवाज ऐकू आल्याचे सांगितले जात आहे.

स्फोट झालेले ठिकाण दारुगोळ्याचे साठवण क्षेत्र असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून स्फोटात किती नुकसान झाले आहे, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, ज्या पद्धतीने हे बॉम्बस्फोट झाले आहेत त्यावरून येथे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्फोटामागे कोणाचा हात आहे याची माहिती समोर आलेली नाही

सियालकोट येथील घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) सध्या त्यांचे सरकार वाचवण्यासाठी धडपडत करत आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) च्या सुमारे 100 खासदारांनी 8 मार्च रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केल्याचा आरोप पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने केला होता.

खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशातील आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईला जबाबदार असल्याचाही आरोप केला जात आहे. घटनेनंतर अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत या ठिकाणी अनेक साखळी स्फोट झाल्याचा दावा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.