राज्य कला प्रदर्शनात स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील २ चित्रांची निवड

0

लोकशाही न्युज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य कला संचलनालयातर्फे घेण्यात आलेल्या ६२ वे राज्य कला प्रदर्शनात स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड झाली असुन महाविद्यालयासह शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

६२ वे राज्य कला प्रदर्शनात महाराष्ट्रातून निवडक कलाकृतींची निवड झालेली आहे. यात पाचोरातील महाविद्यालयातील २ विद्यार्थ्यांचे चित्रांची निवड झाली ही अभिमानास्पद बाब आहे. यात महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी प्रथमेश दिलीप सोनवणे याने बुद्धिबळ हा उपविषय घेऊन 2D डिझाईन ह्या विषयावर चित्र रेखा रंगविले व ह्या चित्राची निवड करण्यात आलेली आहे.

तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी पल्लवी नरेंद्र पाटील हिने जलरंग या माध्यमात उत्कृष्ट निसर्ग चित्रण रंगविले असून या चित्राची देखील निवड करण्यात आलेली आहे. राज्य कला प्रदर्शन ३ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत पुणे बिंबवेवडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे भरविले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा कुसुम मित्रा, सचिव नरेश मित्रा, महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप पाटील, प्रा. निलेश शिंपी, कलाशिक्षक प्रमोद पाटील, सुबोध कांतायन, संदीप परदेशी तसेच पालकांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.