हिवरी परिसरात बिबट्याची दहशत; दोन माकडांना केले फस्त नागरिक झाले त्रस्त

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पहुर (Pahur) तालुका जामनेर येथून जवळच असलेल्या हिवरी परिसरात शेतात राहणारे एका नागरिकाला बिबट्या दिसल्याने त्याने गावकऱ्यांना ही सूचना दिली. त्यावर गावकऱ्यांनी विश्वास ठेवावा की न ठेवावा कि नाही हा विचार करत असतांना हिवरी रोड वरून प्रवास करणाऱ्या दोन इसमांना सुद्धा बिबट्या दिसला. त्यामुळे हिवरी येथील गावकऱ्यांनी वन अधिकार्‍यांना पाचारण केले असता वनपरिक्षेत्र अधिकारी पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल जामनेर प्रशांत पाटील तसेच वनरक्षक अशोक ठोंबरे, वन कर्मचारी जीवन पाटील, विजय चव्हाण सुनील पालवे ,के डी महाले यांनी त्वरित हिवरी परिसरात धाव घेतली.

शोध कार्य करीत असताना त्यांना हिवरी शिवारातील रघुनाथ जयराम पाटील यांच्या शेतातील केळी बागेत बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यावरून बिबट्या या शिवारामध्ये वावरत आहे. याची खात्री त्यांना झाल्याने त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. त्याचदरम्यान बिबट्याने दोन माकडांना फस्त केल्याची घटना या ठिकाणच्या नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना सांगितली. जयंत जोशी यांच्या शेतातील कामगारांनी बिबट्या निदर्शनास पडल्याचे सांगितले. आणि बिबट्याला जेर बंद करण्याची मागणी केली असता वन अधिकारींनी मात्र हा बिबट्या लोकांना त्रास देणारा नसून हा एका ठिकाणी थांबत नसल्याने तो या ठिकाणी वास्तव्यास राहील असे नाही. तर तो पुढे निघून गेला असल्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता सतर्कता बाळगावी. शेतामध्ये काम करीत असताना फटाक्यांचे आवाज काढावेत, रात्रीला झोपताना शेकोटी करून झोपावे, अशा प्रकारची काळजी घेण्याचे वनपाल व त्यांच्या टीमने गावकऱ्यांना सांगितले यावेळी वनपाल व त्यांच्या टीम सोबत परिसरातील शेतकरी नितीन देशमुख, राहुल पाटील, नवल देशमुख, रमेश पाटील, प्रवीण पाटील, मयूर पाटील, उमेश पाटील तसेच पत्रकार जयंत जोशी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.