निराधार मातेसह चिमुकलीला मानव सेवा आश्रमाचा आधार

0

वाकोद, विशाल जोशी, लोकशाही न्यूज नेटवर्क  

रक्षाबंधनाच्या दिवशी पहुर बस स्थानकात परिसरात उघड्यावर जीवन जगणाऱ्या एका निराधार महिलेला व ४ महिन्यांच्या चिमुकलीस चोपडा तालुक्यातील वेळे येथील मानव सेवा आश्रमात दाखल करण्यात आलं.

अगोदरच मनोरूग्ण त्यात समाजातील काही राक्षस वृत्तीच्या नरधामानी तीच्याशी आपली शारिरीक भुक भागवण्यासाठी तीला गर्भवती करून सोडलं. त्यात तिने एका मुलीला जन्म दिला. ती चिमुकली अवघी ४ महिन्यांची होत नाही तोवर ती महिला पुन्हा अडिच महिन्यांची गर्भवती असल्याच समोर आलं आहे.  अगोदरच आई आणि मुलगी अतिशय वेदना सहन करत असतांना समाजातील काही नरधामुळे पुन्हा आई होण्याची वेळ या महिलेवर आली आहे .

साधु संताची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  महाराष्ट्रात ही राक्षसी विचारांची लोक कधी सपंतील.  या महिलेला रंक्षाबंधानाची भेट म्हणून पहुर येथील पत्रकार, काही सामाजिक कार्यकर्ता यांनी मानव सेवा संस्थेचे संचालक नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क करून महिलेसह बाळाला विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते कवी कासार यांच्या रूग्णवाहिकेव्दारा या ठिकाणी दाखल केले. वैद्यकिय तपासणी नंतर ती महिला गर्भवती असल्याच समोर आलं.

 खाकीतील माणूसकीचे दर्शन

पहुर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक प्रताप इंगळे यांनी सदर निराधार महिलेसह चार महिन्यांच्या चिमुकलीला मानव सेवा आश्रमात दाखल करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून स्वत: बस स्थानक परिसरात उपस्थित राहून या महिलेला निरोप दिला.

 निराधार महिलेच्या गावी संपर्क 

मानव सेवा संस्थेचे संचालक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशमधील खोहरी गावाच्या मुखीया यांना संपर्क केला असता सदर महिलेचे कुंटुबिय चार पाच वर्षांपासून सुरत या ठिकाणी राहायला गेलेले असून त्यांचा संपर्क करून कळवतो असल्याचे सांगितले.  त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी जर या महिलेला घेऊन जाण्यास तयारी दर्शवली तर त्यांच्या स्वाधीन करू नाहीतर सदर महिलेचे आम्ही सांभाळ करू असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

 डॉक्टरांचा सल्ला घेऊन गर्भपाताचा निर्णय

मानसिक उपचार तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ यांच्या तपासणीनंतर त्यांचा सल्ला घेऊन जन्माला येणाऱ्या बाळाचे संगोपन आई करू शकेल किंवा नाही,  यांनतर गर्भपाताचा निर्णय घेतला जाईल असं नरेंद्र पाटील यांनी लोकशाहीशी बोलतांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.