उभ्या असलेल्या कारला ट्रकची जोरदार धडक ; कारचा चुराडा !

पहूर येथे साई तोलकाट्याजवळील घटना

0

उभ्या असलेल्या कारला ट्रकची जोरदार धडक ; कारचा चुराडा !

पहूर येथे साई तोलकाट्याजवळील घटना

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) पहूर येथे साई तोलकाट्याजवळ उभ्या कारला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने कारचचा चुराडा झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव छत्रपती संभाजी नगर महामार्ग लगत पहूर येथे साई तोलकाट्याजवळ उभ्या मारुती सियाज गाडीस मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात सुदैवाने जीवित आणि झाली नाही. भुसावळ येथील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक रवींद्र सपकाळे हे आपल्या मारुती सियाज गाडीने संभाजीनगर हून भुसावळ कडे येत असताना वाटेत पहुर येथे साई तोल काट्याजवळ त्यांनी आपली मारुती सियाज कार एम.एच. 19 सी जे बी 777 ही गाडी थांबवून लघुशंकेसाठी गेले असता .नेमके त्याच वेळी मागून येणाऱ्या एम.एच. 21 एक्स 7868 या ट्रकने जोरदार धडक दिली. यात मारुती सियाज गाडीचे नुकसान झाले सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.