Sunday, November 27, 2022

पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम…

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

 

भारत निवडणुक आयोग यांचेकडील दि. 14 जुलै 2022 रोजीचे पत्रानुसार दि. 01/11/2022 या अर्हता दिनांकावर आधारीत नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी नव्याने (de novo) तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार मागील पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची मतदार यादी या निवडणुकीसाठी उपयोगात येणार नसल्याने पात्र मतदारांनी आता पुन्हा नव्याने मतदार नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी प्रक्रीया दि. 1 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. दि. 01 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार नोंदणी करता येणार आहे. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. 1/10/2022 पासून खालील अर्हता धारण करीत असलेल्या व्यक्तींना विहित नमुना नं. 18 अन्वये पदवीधर नांव नोंदणी करिता अर्ज करता येईल व अर्ज स्वीकारणेचा अंतीम दिनांक 07/11/2022 असा आहे.

 

अर्हता :- जी व्यक्ति भारताची नागरिक आहे आणि त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि ती व्यक्ती 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी (अर्हता दिनांक) किमान तीन वर्ष भारतातील विद्यापिठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असेल.

 

अर्जासोबत पुढील प्रमाणे प्रमाणपत्र साक्षांकित केलेले असावेत.

विद्यापीठ किंवा संबंधीत संस्था यांनी दिलेले मुळ पदवी/ पदविका प्रमाणपत्र स्वयंसाक्षांकित आणि कोणताही अतिरीक्त पदनिर्देशित अधिकारी जो (अ) तहसिलदार (ब) शासकीय पदवी महाविद्यालये/ आंतर महाविद्यालये यांचे प्राचार्य (क) मुलींचे शासकीय पदवी महाविद्यालये/ आंतर महाविद्यालये यांचे प्राचार्य (ड) सर्व गटांचे सहगट विकास अधिकारी (ई) नगरपालिका / नगरपंचायतीचे (राजपत्रित) कार्यकारी अधिकारी (फ) संबंधीत जिल्हयाचे सर्व राजपत्रित अधिकारी, (फ) नोटरी पब्लीक यांनी यथोचितरित्या अधिप्रमाणीत केलेली प्रत.

ब) शासकीय अभिलेखातील एखाद्या नोंदीची प्रत किंवा कार्यालयाच्या राजपत्रित प्रमुखांच्या अभिरक्षेतील शासकीय अभिलेखांमधील नोंदीच्या आधारे तिसऱ्या अनुसूचीतील (Third Schedule) (सोबत जोडली आहे) विहीत नमुन्यामध्ये कार्यालयातील राजपत्रित अधिकाऱ्याने पदवीधर कर्मचाऱ्यांना दिलेले प्रमाणपत्र किंवा संबंधित कार्यालय प्रमुखाने यथोचितरित्या स्वाक्षरीत केलेली, दावा सांगणाऱ्या व्यक्तीने धारण केलेली पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र विनिर्दिष्ट करणाऱ्या संविधानिक मंडळ, महामंडळ किंवा सार्वजनिक उपक्रम यांच्या अभिलेखातील नोंदीची प्रत किंवा

क) विद्यापीठाने दिलेली नोंदणीकृत पदवीधर म्हणून नोंदणीपत्राची साक्षांकित प्रत किंवा अधिवक्त्याच्या यादीतील नोंदणीकृत पदवीधराच्या सुचीमधील, वैद्यकीय व्यावसायिकांच्या नोंदवहीतील, सनदी लेखापालांच्या नोंदवहीतील अभियंता संस्थेने ठेवलेल्या अभियंता नोंदवहीतील संबंधीत नोंदीची प्रमाणित प्रत किंवा

ड) दावा सांगणाऱ्याचे प्रतिज्ञापत्र व त्या पृष्ठ्यर्थं विद्यापीठाच्या कुलसचिवांने किंवा कोणत्याही विद्यापीठांच्या कुलसचिवांने किया कोणत्याही विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्याने किंवा तो ज्या महाविद्यालयात शिकत होता, त्या महाविद्यालयातील विभाग प्रमुखाने दिलेले प्रमाणपत्र.

इ) संबंधित विदयापीठाने किंवा संस्थेने दिलेली मुळ गुणपत्रिका यथोचितरित्या स्वयंसाक्षांकित केलेली आणि अतिरिक्त पदनिर्देशित अधिकाऱ्याने यथोचितरित्या अधिप्रमाणीत केलेली तिची कोणतीही प्रत, परंतू असे की. दावा सांगणाऱ्याने संबंधित परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे स्पष्ट दर्शविणारी असावी.

तसेच एकत्रित स्वरुपातील अर्ज मग ते व्यक्तिश: सादर केलेले असोत किंवा पोस्टाद्वारे सादर केलेले असोत समावेश करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून विचारात घेतले जाणार नाहीत, तथापि कार्यालय प्रमुख त्यांच्या कार्यालय अंतर्गत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रित पुढे पाठवू शकतात. कुटुंबाच्या एका सदस्यास त्याच्याच कुटुंबातील इतर सदस्यांचे अर्ज दाखल करता येतील आणि अशा प्रत्येक सदस्याच्या बाबतीत मुळ प्रमाणपत्रावरुन पडताळणी केलले प्रमाणपत्र किंवा यथोचितरित्या स्वयंसाक्षांकित केलेले आधारभूत दस्तऐवज आणि अतिरीक्त पदनिर्देशित अधिकाऱ्याने यथोचितरित्या अधिप्रमाणीत केलेल्या आधारभूत दस्तऐवज यासह नमुना 18 सादर करता येईल.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारास आपला आधार क्रमांक मतदार नोंदणी अर्जात नमूद करता येईल. तथापि आधार क्रमांक सादर करणे हे ऐच्छिक आहे. तसेच भ्रमणध्वनी, दुरध्वनी क्रमांक देखील नमूद करता येईल. नाशिक विभागातील सर्व जिल्हयाचे जिल्हाधिकारी कार्यालयात, उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात व विभागीय आयुक्त कार्यालयात मतदार नोंदणी अर्ज नमुना 18 स्विकारणेसाठी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. याच कार्यालयातून नमुना 18 उपलब्ध करुन देण्यात येतील.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या