टरबुजाची प्रतिकात्मक प्रेतयाञा काढुन पाचोऱ्यात सरकार विरोधात जनआक्रोश मोर्चा

0

पाचोरा ,लोकशाही न्युज नेटवर्क
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आज पाचोर्‍यात सकल मराठा समाज, सर्व पक्ष व विविध सामाजीक संघटनांकडुन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात टरबुजाची प्रतिकात्मक प्रेतयाञा काढुन सरकार विरूध्द घोषणा देण्यात आल्या.आक्रोश जनमोर्चाच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेउन शासनाला निवेदन दिले. जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे लोकशाही मार्गाने आरक्षणाची मागणी करणारे आंदोलकांवर वरिष्ठ आदेशावरून बहुजनांवर दडपशाही आणि केलेला अमानुष लाठी हल्ला निंदनीय होता. यात महिला, लहान मुलं व म्हातारे कोणालाही सोडलं नाही. आया बहिणीचे रक्त सांडले. लाठी हल्लावरच पोलीस थांबले नाहीत तर लोखंडी छर्रे, रबरी गोळ्या, अश्रुधूर नळकड्यांचा वापर करून शांततापूर्ण सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. या प्रकारा विरोधात राज्यसरकार आणि हल्ल्याचा आदेश देणाऱ्यांच्या विरोधात राज्यभर संताप असून त्या निषेधार्थ राज्यभरात तीव्र आंदोलने सुरू आहे.
पाचोरा येथे ८ सप्टेंबर रोजी भरपावसात जामनेररोड वरील शहिद भगतसिंग रिक्षा स्टाॅप, भारत डेअरी थांबा कृष्णापुरी पासून शहरातील सर्व सामाजिक संघटना, महिला संघटना, सर्व पक्षीय आणि बहुजन समाज बांधवांनी या जनआक्रोश मोर्चात सहभाग नोंदविला. तसेच प्रतिकात्मक तिरडीवर टरबूजाची प्रेतयात्रा काढण्यात आली. शहरातील जामनेर रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनआक्रोश मोर्चा आल्यावर तीचे सभेत रूपांतर झालेयावेळी नेतृत्व करणार्‍या नेत्यांनी, शालेय विद्यार्थीनिंनी भाषणातुन सरकार विरूध्द आक्रोश व संताप व्यक्त केला. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.