कुऱ्हाडतांडा येथील एकाकडून तलवार जप्त
लोहारा ता. पाचोरा I लोकशाही न्यूज नेटवर्क

पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत लोहारा दूरक्षेत्रातील कुऱ्हाडतांडा येथून अर्जुन किसन बंजारा (वय-29 याच्याकडून पोलिसांनी पाच हजार रुपये किमतीची बत्तीस इंची तलवार जप्त केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सदर हा घातपात करण्याच्या उद्देशाने तलवार घरात ठेवून आहे अशी खबर गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली होती. त्यास पोहकॉ.अतुल पवार,शैलेश चव्हाण, पोकॉ. अमोल पाटील,प्रमोद वाडीले यांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने घरात ठेवलेली तलवार काढून दिली. यानुसार त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.अतुल पवार हे करीत आहे.


