Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    • शाश्वत शेतीचा ‘स्वामीनाथन मार्ग’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पाचोरा व भडगाव तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा
    जळगाव

    पाचोरा व भडगाव तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 25, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा व भडगाव तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा

    आ. किशोर पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

    पाचोरा I लोकशाही न्युज नेटवर्क

    पाचोरा-भडगाव मतदार संघात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगाम पूर्णतः नष्ट झालेला आहे. शेतात शेतकऱ्यांना पीक ही काढायलाही जाता येत नाही इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाला आहे. मी स्वतः मतदार संघात जाऊन परिस्थितीची पाहणी करून कृषी व महसूल प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

    त्यांनी केलेल्या पंचनामानुसार दोन्ही तालुक्यात १०० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शेतजमिनीमधील पाण्याचा निचरा होत नसून जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचलेले असल्यामुळे पीक सडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात शेतीचे कोणतेच उत्पन्न येणार नाही असे दिसत आहे. मागील दोन वर्षापासून दोन्ही तालुक्यांत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

    मात्र त्यांना अद्यापही त्यांची भरपाई मिळालेली नाही. त्यात आत्ताच्या निसर्गाच्या अस्मानी संकटाने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यासाठी दि. ११ संप्टेंबर २०१९ च्या लागू केलेल्या निकषाप्रमाणे शासनाने मदतीसाठी काढलेल्या जिआर नुसार एनडीआरएफच्या मदतीच्या निकषाप्रमाणे ३ पट मदत दिली होती. त्याचप्रमाणे तशीच मदत माझ्या मतदार संघात मिळावी.

    पाचोरा येथे दिनांक १६, सप्टेंबर २०२५ (११४.८ मी.मी) २२ सप्टेंबर २०२५ (१४७.८ मी.मी) व २३ सप्टेंबर २०२५ (१३९.३ मी.मी) संप्टेंबर २०२५ ला पाउस झाला असून तालुक्याचा सरासरी पाऊस १३६.४ मीमी असून तो सरासरी पर्जन्यपेक्षा जास्त पेक्षा जास्त २५७.८ मीमी पाऊस पाचोरा तालुक्यात झाला. दिनांक २३ संप्टेंबर २०२५ पर्यंतचे एकूण पर्जन्याचे प्रमाण १८९ टक्के आहे. यांची शासकीय नोंद उपलब्ध आहे.

    तसेच भडगाव तालुक्यात दिनांक २३ संप्टेंबर २०२५ रोजी पर्जन्याची सरासरी ९०.७० मी.मी इतकी नोंद झालेली आहे. उक्त पर्जन्याची पर्जन्यमापकानुसार शासकीय नोंद शासनाच्या एकरी उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर शासन निर्णयानुसार माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांनाही आपण मदत द्यावी ही विनंती.

    अतिवृष्टीमुळे दोन्ही तालुक्यातील खरीपाची पिके पूर्णपणे नष्ट झालेले आहे, त्यासोबत शेत जमिनी वाहून गेलेल्या आहेत, विहिरी खचलेल्या असून, शेतातील पाईप लाईन, ठिबक, बांध, फळबागा इत्यादीचे पूर्णताः नष्ट झालेले असून, पक्के डांबरी रस्ते दिसेनासे झालेले आहे. पूल नष्ट होणे, बंधारे वाहून जाणे, दुध दुभती जनावरे बैल, गाय, बकरी, म्हैस, कोंबडी इत्यादी मोठ्याप्रमाणात हानी झाली आहे.

    तसेच काही शेतकऱ्यांकडील मळणी यंत्रणे, शेतीचे अवजारे, इत्यादी नष्ट झालेले आहे. याव्यतिरिक्त पाचोरा भडगाव तालुक्यातील रहिवाशी घरांचे संपूर्ण संसार वाहून गेलेले आहे. पाचोरा व भडगाव शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे. इत्यादी परिस्थितीचा सांख्ल्याने विचार करता पाचोरा-भडगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना वरील शासन निर्णयानुसार तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून ३ पट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे पाचोरा मतदार संघाचे आ. किशोर पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पनण व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची भेट घेऊन केली आहे

    #bhadgaon #pachora Eknath shinde MLA Kishor Patil
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026

    राहुल गांधी यांनी चर्चेपासून पळू नये : भाजपची मागणी

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif