Sunday, May 29, 2022

आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने भरडधान्य खरेदीला होणार सुरुवात

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

- Advertisement -

पाचोरा व भडगाव तालुक्यात पणन खरीप हंगाम २०२१ – २२ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदीला सोमवारपासून सुरुवात होत असून विशेष बाब म्हणून पाचोरा व भडगाव येथील भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करावीत याबाबत आ. किशोर पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

- Advertisement -

भरड धान्य खरेदी केंद्र विशेष बाब म्हणून तात्काळ सुरू करण्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी दि. १७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून विनंती केली होती. याची तात्काळ दखल झाल्याने खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यात सन – २०२१ मध्ये उद्भवलेल्या अतिवृष्टी व वादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्यात आले आहे. परंतु या नुकसानामधून वाचलेला उर्वरित सुमारे ३० ते ३५ टक्के शेतमाल शेतकऱ्यांकडे पडून आहे. सदरील शेतमाल शासनाने खरेदी केल्यास शेतकरी बांधवांना आर्थिक मदत होईल या भावनेतून आ. किशोर पाटील यांनी पाठपुरावा केला होता.

दरम्यान धान्य खरेदीचा शुभारंभ आ. किशोर पाटील यांच्याहस्ते काटा पूजन करून करण्यात येणार असून पाचोरा येथे सकाळी १० वाजता शासकीय गोडाऊन येथे तर भडगाव येथे शासकीय गोदाम येथे सकाळी ११ वाजता खरेदीला सुरुवात होणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसिलदार व उपविभागीय अधिकारी व संबंधितांना निर्देश दिले आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या