Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»भयंकर.. बालकासह पती पत्नीची रेल्वेखाली आत्महत्या
    जळगाव जिल्हा

    भयंकर.. बालकासह पती पत्नीची रेल्वेखाली आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 6, 2025Updated:May 6, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पाचोरा येथून मन हेलावून टाकणारी घटना घडलीय. पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान अनोळखी एक पुरुष, एक महिला व त्यांच्यासमवेत असलेल्या एका अडीच वर्षांच्या मुलासह भरधाव रेल्वे समोर झोकुन देत आत्महत्या केली. सदर घटना ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजुन २० मिनिटांनी घडली. या दुर्घटनेत मयत तिघांपैकी पुरुषाची ओळख पटली असुन महिला व बालकाची ओळख पटविण्याचे काम पाचोरा पोलिस करीत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार,  पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७६ / १९ नजीक एक महिला, पुरुष व एक लहान बालक रेल्वे पटरीवरुन चालत येत असताना याचवेळी मनमाडकडुन भुसावळकडे जाणाऱ्या २२१०३ अयोध्या सुपरफास्ट एक्स्प्रेस समोर सापडल्याने तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती अयोध्या एक्स्प्रेसचे लोकोपायलट डी. एफ. डिसुझा यांनी पाचोरा रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली.

    सदरची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनला मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पो. उ. नि. योगेश गणगे, पो. हे. काॅ. राहुल शिंपी, पो. काॅ. अशोक हटकर हे रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांचेसह तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा केला असता अनोळखी पुरुष, महिला व सुमारे अडिच ते तीन वर्षाच्या मुलाचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह पडलेले दिसले.

    रुग्णवाहिका चालक किशोर लोहार व पोलिसांच्या मदतीने तिघांचे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान ६ मे रोजी मयतांपैकी पुरुषाची ओळख पटली असुन राजेंद्र निंबा मोरे (वय २२, रा. भातखंडे खुर्द ता. पाचोरा) अशी ओळख पटली आहे. मात्र अनोळखी महिला व बालकाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पाचोरा पोलिस अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.

    घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या दुर्घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. योगेश गणगे हे करीत आहेत. यासोबतच या तिघांनी आत्महत्या का केली याचा ही शोध पाचोरा पोलिस घेत आहेत.

    #pachora
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026

    उशिराने लग्न लागल्यामुळे वधू वर पक्षाला 2 हजारांचा दंड

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif