polo clothing coupons romantic gifts for girlfriend online one kings lane coupon code april 2014 how to make a origami gift box easy
Monday, December 5, 2022

आक्षेपार्ह फोटो काढून विवाहितेवर वारंवार अत्याचार

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

पाचोरा तालुक्यातील एका गावातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहिता घरी एकटी असल्याचे पाहून एका तरुणाने धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर अत्याचारानंतर नराधमाने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो काढले व हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून विवाहितेवर वारंवार अत्याचार केले. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

२१ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिड महिन्यापूर्वी पती, सासू-सासरे व दिर शेतात गेलेले होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास विवाहिता घरी एकटी असल्याचे बघून आरोपी वैभव चौधरी हा घरात आला व त्याने तोंड दाबले. तू ओरडली तर विचार कर, अशी धमकी देऊन आरोपीने पिडीतेवर अत्याचार केला. त्यावेळी वैभवने त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो देखील काढले. यानंतर वैभव चौधरी याने पीडितेच्या व्हॉट्सअपवर मॅसेज करुन काढलेले फोटो पाठवले. हे फोटो तुझ्या नवऱ्याला व सासू, सासऱ्यांना दाखवेल तसेच तुझ्या मुलाला मारुन टाकेल, अशी धमकी देत पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले.

दरम्यान ७ ऑक्टोंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पीडिता घरी एकटी असताना आरोपी वैभव हा पुन्हा एकदा पिडीतेच्या घरात घुसला. परंतू तेवढ्यात पीडितेचे सासू-सासरे व पती शेतातून घरी परत आले. पीडितेचा पती व सासरे यांनी वैभवला तू आमच्या घरात का आला? असे विचारले असता त्याने पिडीतेच्या पती व सासऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडाओरड एकून वैभवचा चुलत भाऊ ऋषी चौधरी हा हातात लाकडी काठी घेऊन आला. त्यानेही पीडितेच्या पतीच्या डोक्यात काठी मारली. तसेच सासू सासऱ्यांनादेखील चापटा बुक्कयांनी मारहाण केली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा संशयितापैकी वैभवला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या