पाचोरा येथे पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेसला थांबा द्यावा
पाचोरा रेल्वे कृती समितीतर्फे खा. स्मिता वाघ यांना निवेदन

लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोरा रेल्वे स्टेशनवर सायंकाळी सहा वाजेनंतर मुंबईहुन व मुंबईकडे जाण्यासाठी कोणतीही रेल्वे नसल्याने त्यामुळे पाचोरासह परिसरातील चार ते पाच तालुक्यांची मोठी गैरसौर निर्माण झाली आहे. पाचोरा रेल्वे स्थानकावर पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस यांना थांबा मिळावा म्हणून पाचोरा रेल्वे कृती समितीतर्फे वारंवार पाठपुरावा सुरु आहे. यासाठी पाचोरा रेल्वे कृती समिती तर्फे विविध आंदोलन करण्यात आली. डी. आर. एम. रेल्वे मंत्रालय, रेल्वेमंत्री यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. पाचोरा स्थानकावर या दोन रेल्वे गाड्या त्याचबरोबर नाशिक देवळाली भुसावळ शटल ही गाडी पूर्ववत सुरू करावी व इतर मागण्यासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खा. स्मिता वाघ यांना पाचोरा रेल्वे कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदन देतेप्रसंगी पाचोरा रेल्वे कृती समितीचे सहसचिव शेहबाज बागवान उपस्थित होते.


