तरुणाच्या सतर्कतेने टळला कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये मोठा अनर्थ…

0

 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क:

गाडी क्रं. २२५३८ कुशीनगर एक्सप्रेसच्या जनरल बोगी मध्ये नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानका दरम्यान पहाटे पाच वाजेच्या सुमारास एका प्रवासी बॅग ने अचानक पेट घेतला. घडलेला प्रकार अन्य प्रवास्यांच्या लक्षात येताच डब्यात एकच खळबळ उडाली. यावेळी वरच्या बर्थवर असलेली बॅग खाली फेकली असता खाली बसलेल्या अजय मगरे (२३) या युवकाच्या बाजुला पडली, यावेळी अजयने पायाने आग विझविण्याच्या प्रयत्न केलामात्र यादरम्यान त्याला किरकोळ इजा झाली. दरम्यान प्रवाशांनी चैन पुलिंग करुन गाडी थांबवली. गाडी थांबल्यावर आग लागलेली बॅग गाडीतुन बाहेर फेकली. सुदैवाने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला.

दरम्यान आर.पी.एफ. यांनी बोगी चेक केली. त्यानंतर एक्सप्रेस पाचोऱ्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. एक्सप्रेस सकाळी ७:४५ वाजता पाचोरा रेल्वे स्थानकावर आल्यानंतर अजय मगरे यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात चाळीसगावचे ए.पी.आय. किसन राख यांनी अजय मगरे यांचेकडुन घटनाक्रम ऐकुन जबाब नोंदवला आहे.

घटनास्थळी नाशिक येथील फाॅरेंन्सिंक टीम दाखल झाली व त्यांच्याकडून बॅगेची सखोल चौकशी करण्यात आली. ज्या बॅगने कुशीनगर एक्सप्रेस मध्ये अचानक पेट घेतला ती बॅग कोणाची होती याचा शोध घेणे हे रेल्वे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. नांदगाव ते न्यायडोंगरी दरम्यान चैन पुलिंग केल्यानंतर घटना स्थळावरुन बॅग मालकाने पलायन केले असावे ? असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.