पाचोऱ्यात मंडळ अधिकारी अन् तलाठ्यावर वाळू चोरट्यांचा हल्ला

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा येथील वाळू चोरीला आळा घालण्यासाठी गस्तीवर असलेल्या मंडळ अधिकारी व तलाठ्यावर अज्ञात पाच वाळू चोरट्यांनी हल्ला करून चापटा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री १२.३० वाजेच्या दरम्यान घडली.

वाळू चोरट्यांनी तोंडावर मास्क घातलेला असल्याने तलाठ्यांना चोरटे ओळखू शकले नाही. घटनेची माहिती मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी तहसिलदार कैलास चावडे यांना सांगितल्यानंतर तहसिलदार कैलास चावडे यांनी पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना घटनेची माहिती देवून वाळू चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्याने पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात पाच वाळू चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

यावेळी निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, तलाठी संघटनेचे अध्यक्ष नदीम शेख, उपाध्यक्ष संदीप चव्हाण, सचिव सागर बागूल, तलाठी कैलास बहिर, जिल्हा उपाध्यक्ष आर. डी. पाटील, दिपक दवंगे उपस्थित होते. अज्ञात हल्लेखोरांना त्वरित ताब्यात घेऊन कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती तलाठी संघटनेचे अध्यक्ष नदीम शेख यांनी सांगितले.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड मंडळाचे मंडळ अधिकारी प्रकाश डहाके, तलाठी शिवाजी डोंगरे, भरत परदेशी, उमेश सोनवणे हे पथक मंगळवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अंतुर्ली फाट्याजवळ गस्तीवर असतांना एक अज्ञात इसम मोटारसायकल येऊन पथकाजवळ उभा राहिला. त्यास तलाठी भरत परदेशी यांनी “तू येथे काय करतो आहेस” असे विचारले असता त्याने सर्व पथकासोबत हुज्जत घातली व थोडे बाजूला जाऊन कुणास तरी फोन करून बोलावून घेतले. फोन केल्यावर अवघ्या सात मिनीटात चार इसम चार चाकी वाहनातून आल्यानंतर थेट मंडळ अधिकारी व तलाठी शिवाजी डोंगरे यांना शिवीगाळ करून चापटा बुक्यांनी मारहाण केली. आणि काही क्षणात चार चाकी वाहनाची व मोटार सायकलची मागील नंबर प्लेट तोडून त्याच वाहनातून पसार झाले.

चारचाकी चालक हा दाढीवाला तर इतरांनी तोंडावर मास्क घातलेला असल्याने हल्लेखोरांना तलाठी ओळखू शकले नाही. गेल्या चार महिन्यांपूर्वी तारखेडा रोडवर तलाठी शिवाजी डोंगरे यांचेवर असाच हल्ला झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.