नाफेडचे कांदा खरेदी केंद्र जळगाव जिल्ह्यात सुरू करावे

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसखेडा येथील शेतकरी यांनी बाजर स्थिरीकरण योजनेअंतर्गत दरवर्षी नाफेडकडून कांदा खरेदी केली जाते. परंतु जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाफेडच्या कांदा खरेदी बाबतीत योग्य ती माहिती मिळत नसल्याने कांदा विक्रीमध्ये अडचणी येत असतात.

यावर्षी मे, जुनमध्ये नाफेडची कांदा खरेदी केली जाईल त्या वेळेस जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचाही कांदा नाफेडने खरेदी करावा, यासाठी आपण नाफेड व केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करावा व शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला योग्य भाव मिळुन द्यावा या बाबतचे निवेदन जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांना देण्यात आले.

खासदार उन्मेश पाटील हे गिरणा परीक्रमेच्या दुसऱ्या टप्प्या प्रसंगी तालुक्यातील दुसखेडा येथे आले असतांना याबाबतचे निवेदन शेतकरी मनोज पाटील, डी. एस. पाटील, प्रकाश महाजन, यशवंत महाजन, नितीन महाजन, गणेश पाटील, सरपंच मनोज पाटील, उपसरपंच संजय भिल्ल व सर्व शेतकरी बांधव यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.