दोन महिन्याच्या थकीत रेशन धान्यासाठी काँगेसचे आंदोलन

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

शहरास तालुक्यातील बहुतांश रेशनिंग धान्य गेल्या दोन महिन्यांपासून मिळाले नसुन शहर आणि ग्रामीण भागात तात्काळ धान्य वाटपासाठी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा देत निवेदनाची दखल घेत तात्काळ धान्य पुरवठा करण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले.

महसुल विभाग अंतर्गत पुरवठा विभागाने गेल्या दोन महिन्यांपासून शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आणि विकतचे धान्य जानेवारी सह फेब्रुवारी महिन्याचे वाटप अद्याप झालेले नाही. त्यात ग्रामीण भागात काही दुकानदार नागरिकांसाठी धान्य वाटप केल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप बहुतांश लोकांनी वाटप केले नाही ते तात्काळ वाटप करण्यात यावे.

यासाठी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार कैलास चावडे यांना आंदोलनचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, माजी अध्यक्ष साहेबराव पाटील, शेख इस्माईल शेख फकिरा, महीला शहर अध्यक्षा अॅड. मनिषा पवार, ओबीसी सेल अध्यक्ष शेख इरफान शेख इक्बाल मणियार, राहुल शिंदे, अमजद खान मजीद खान, शरीफ शेख, शंकर सोनवणे, तन्वीर शाह, मोहम्मद खान रशिद खान, सैय्यद युसूफ सैय्यद इमाम, प्रदीप चौधरी, गंगाराम तेली, अमजद खान नासिर खान, सलीम शेख, सैय्यद लाल आदी उपस्थित होते.

तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने झोपेचे सोंग न घेता जे दुकानदार धान्य घेण्यासाठी हेतुपुरस्सर चलन भरत नाही अशांना नोटीस न देता पाठीशी घालण्याचे काम होत आहे. नागरिकांना प्रति माणूस तीन किलो गहु दोन किलो तांदुळ आणि ग्रामीण भागातील साखर देणे बंधनकारक आहे. जे दुकानदार देत नसतील त्यांनी काँग्रेस पदाधिकारी यांच्याशी संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी तहसिलदार कैलास चावडे यांनी काँग्रेस पदाधिकारींना दोन महिनेपासून धान्य पुरवठा होत नाही हे सत्य असुन तांत्रिक कारणांमुळे झाले असून आजच संबंधित विभागाच्या बैठका घेऊन पुरवठा तात्काळ करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.