आ. किशोर पाटलांच्याहस्ते विद्यार्थ्यांना “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तके भेट

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे नूतन वास्तू उद्घाटन सोहळा व सत्कार समारंभ दि. १२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांनी पिंपळगाव (हरेश्वर) येथील स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. राजेंद्र चिंचोले लिखित “स्पर्धा परीक्षा सारथी” पुस्तके भेट देण्यात आली.

या कार्यक्रमास माजी आमदार दिलीप वाघ, खासदार उन्मेष पाटील यांच्या सुविद्य पत्नी संपदा पाटील, दिपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन, पाचोर्‍याचे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जि. प. सदस्य मधुकर काटे, रत्नप्रभा पाटील, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन, रवींद्र जाधव, प्रा. राजेंद्र चिंचोले, प्राचार्य प्रमोद महाजन, पी. एस. पाटील, एस. टी. गीते, शालिग्राम मालकर, नितीन तावडे, उद्धव मराठे, डॉ. भरत पाटील, ग्राम विकास मंडळाचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. पुस्तक वितरण कार्यक्रमाचे नियोजन गजु पाटील, प्रा. प्रशांत चौधरी, मिलिंद पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here