ज्वेलर्स दुकानातील घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश 

कुख्यात गुन्हेगारासह मुददेमाल हस्तगत, पाचोरा पोलीसांना मोठे यश

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटयांनी पाचोरा शहरातील सराफ गल्लीतील राहूल विश्वनाथ चव्हाण यांचे मालकीच्या पाटील ज्वेलर्स दुकानाचे चॅनल गेट तोडून दुकानात प्रवेश करुन दुकानातील सी. सी. टी. व्ही. कॅमे-याची तोडफोड करुन तेथील डी. व्ही. आर. व दुकानातील ६८ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करुन चोरुन नेले होते.

त्याबाबत राहून विश्वनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस स्टेशनला गु.र.नं. ४९/२०२५ बीएनएस- २०२३ चे कलम ३०५,३३१(४) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कवीता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांचे मागदर्शनाखाली सुरु असतांना पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी विविध टिम तयार करुन पाचोरा पोलीसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवुन घटनास्थळी फिंगर प्रिंट तज्ञ, डॉग स्कॉडला पाचारण करुन आजुबाजुचे सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासले असता एक सफेद रंगाची बोलेरोतुन आरोपींनी येवुन गुन्हा करुन फरार झाल्याचे दिसुन येत होते.

याबाबत जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला सी. सी. टी. व्ही. फुटेज प्रसारीत करुन गुन्हयाची माहिती देवुन अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना २ फेब्रुवारी रोजी धरणगाव पोलीस ठाणे हद्दीतून एक बोलेरो वाहन चोरी झाल्याने धरणगाव पोलीस देखील अज्ञात आरोपीतांच्या मागावर असतांना दिनांक ७ फेब्रुवारी रोजी रामानंद नगरपोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीसांना त्यांचे हददीमध्ये अज्ञात आरोपी गुन्हयातील चोरलेले वाहन सोडून पळतांना सी. सी. टी. व्ही. कॅमे-यामध्ये कैद झाल्याचे दिसुन येत असल्याने त्या वर्णनावरुन तपास करीत असतांना त्यातील आरोपी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी (रा. राजीव गांधी नगर, जळगाव) हा असल्याची पक्की खात्री झाल्याने रामानंद नगर पोलीसांनी ८ फेब्रुवारी रोजी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी यास सापळा रचुन त्यास राजीव गांधी नगर जळगाव येथुन ताब्यात घेवुन धरणगाव पोलीस ठाणे कडील दाखल गुन्हा रजि. नं. ३१/२०२५ मध्ये सदरचे आरोपीतास अटक करण्यात आली.

दरम्यान गुन्हयातील बोलेरो कार क्रमांक एम. एच. – १९ – ए एक्स – ७०९८ जप्त करण्यात आली होती. सदर आरोपीताने ४ फेब्रुवारी रोजी खामगाव बुलढाणा येथे ए. टी. एम. फोडुन ते सदर बोलेरो मध्ये घेवुन जाण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे. म्हणुन सदर गुन्ह्याचा अभिलेख पडताळणी केली असता शिवाजी नगर पोलीस स्टेशन खामगाव गु. र. नं. २१ /२०२५ बी. एन. एस. कलम ६२ प्रमाणे दाखल असल्याचे मिळुन आले.

सदर आरोपी याबाबत माहिती पाचोरा पोलीसांना समजताच पाचोरा पोलीसांनी तात्काळ धरणगाव येथे जावुन तेथील अटकेतील आरोपी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नी रा. राजीव गांधी नगर, जळगाव यास पाचोरा पोलीस ठाणे कडील गुन्हयात वर्ग करण्यात येवुन आरोपीकडे गुन्हयाबाबत विचारपुस केली असता प्रथमतः आरोपीताने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास अधिक विश्वासात घेवुन गुन्हयाबाबत सखोल चौकशी करता अटक आरोपीने गुन्हयाची कबुली देवुन सदरचा गुन्हा त्याचे साथीदार हघुलसिंग ऊर्फ शक्तीसिंग जिवनसिंग जुन्नी रा. राजीवगांधी नगर, जळगाव, सुबेरसिंग राजुसिंग टाक रा. मानवद परभणी, शेरुसिंग स्वजितसिंग बोंड रा. बोंड परभणी यांचे मदतीने केल्याचे व गुन्हयातील मुददेमाल जळगाव येथील सोनाराकडे गहाण ठेवले.

या बाबत कबुली दिल्याने पोलीसांनी तात्काळ जळगाव येथे जावुन अटकेतील आरोपी रणजितसिंग जिवनसिंग जुन्नीयाने समक्ष घरफोडी चोरीतील सोने चांदीचे वस्तु विकलेल्या सोनाराचे दुकान दाखवुन त्याचे कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला माल सोन्या चांदीची ६७ हजार ७१ रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात पाचोरा पोलीसांना यश आलेले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पो. हे. काॅ. राहूल शिंपी, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक रणजित पाटील, पो. कॉ. योगेश पाटील, पो. कॉ. सागर पाटील, चा. पो. कॉ. मजिदखान पठाण यांचे पथकाने केली आहे. अटक आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असुन अटक आरोपीताने त्याचे साथीदारांचे मदतीने अशाच प्रकारचे गुन्हे यापुर्वी केल्याची शक्यता असुन त्यादृष्टीने पाचोरा पोलीस पुढील तपास करीत आहे.

सदर गुन्ह्याचा तपास करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबददल पोलीस अधीक्षक जळगाव यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.