Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह एक जण अटकेत
    गुन्हे वार्ता

    दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह एक जण अटकेत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 28, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  

    पाचोरा तालुक्यातील जारगाव चौफुली येथे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसांसह पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.  अरबाज खान जहुर खान (वय २४, रा. अक्सा नगर, जारगाव ता.पाचोरा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा पोलीस स्टेशनला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, जारगाव चौफुली परिसरात एक इसम गैरकायदेशीर गावठी कट्टे घेऊन फिरत आहे. या माहितीनुसार, पोहेकॉ राहुल शिंपी आणि पोकॉदिनेश पाटील यांनी स्थानिक दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा टाकून कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी जारगाव चौफुली येथील ए वन काटा परिसरात छापा टाकला.

    यावेळी संशयित अरबाज खान जहुर खान याच्या कंबरेजवळ त्याच्या पॅन्टच्या खिशात हात घालत असल्याचे पाहून पो. काॅ. दिनेश पाटील यांनी त्याचे दोन्ही हात दाबून धरले. त्याच्या अंगझडतीदरम्यान त्याच्या पॅन्टच्या खिशातून प्रत्येकी २० हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे आणि २ हजार रुपये किंमतीचे चार जीवंत काडतुसे बरोबर सापडले. त्याच्या विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    #crime #pachora
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    आणखी एका भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार

    May 7, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif