मोठी बातमी.. पाचोऱ्यात मविआ उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक

थेट आमदारावर केले आरोप, आमदारांनी सर्व आरोप धुडकावले 

0

 

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

जळगावमधील पाचोऱ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या गाडीवर काही लोकांनी दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली असून या दगडफेकीत त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केल्याने निवडणुकीच्या एक दिवस आधीच निवडणुकीला पुन्हा गालबोट लागले.

बाहेरचे गुंड पाचोऱ्यात आले आहेत. अशा लोकांना आणून निवडणूक अधिकाऱ्यांनी याची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी वैशाली सूर्यवंशी यांनी केली आहे. यावेळी वैशाली सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहिती नुसार, निर्मल सीड्सची गाडी शेतातून येत होती. त्यावेळी आमच्या गाडीवर दगडफेक झाली. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास स्वामी लॉन्स येथे काही गुंडांनी गाडीची तोडफोड केली. हे गुंड बिहार, मध्यप्रदेशमधील असून त्याच्या मदतीने या काळात कोणता उद्योग उभारत आहेत?

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, कुठल्या ना कुठल्या गोष्टी करून आमदारांनी बोगस मतांसाठी धडपड चालवली असून याची चौकशी झाली पाहिजे. हे गुंड आमदाराचे होते. निर्मल सीड्सची गाडी एका शेतात गेली होती. दुपारी ही गाडी परतत असताना स्वामी लॉन्सजवळ गुंडांनी गाडीवर दगडफेक केली. यावेळी त्यांनी थेट शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील यांच्यावर आरोप केले आहेत.

 

किशोर आप्पांनी आरोप फेटाळले

दरम्यान याप्रकरणी शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील यांनी हे सर्व आरोप खोडून लावलेत. दररोज आमचे विरोधक वेगवेगळे आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पराभव समोर दिसत असल्याने आरोप होत असल्याचा दावा किशोर पाटील यांनी केलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.