Wednesday, August 10, 2022

मुलीला भेटायला जाणाऱ्या वडिलांचा अपघातात मृत्यू

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

- Advertisement -

तालुक्यातील कुऱ्हाड खु” येथील ४६ वर्षे वयाचा इसम मुलीची डिलेव्हरी झालेली असल्याने तिला जळगांव येथे भेटण्यासाठी जात असतांना कुऱ्हाड बु” ते म्हसास गावा दरम्यान एका चारचाकी वाहने मागवून उडविल्याने त्यास गंभीर अवस्थेत पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ. अमित साळुंखे यांनी मृत असल्याचे घोषित केले.

- Advertisement -

- Advertisement -

अनिल शांताराम चौधरी (वय ४६) असे मयताचे नाव असून अनिल चौधरी हे बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान आपल्या दुचाकीवरून जळगांव येथे मुलीस भेटण्यासाठी जात होते. मागवून चारचाकी धडकल्याने ते जागेवर कोसळले. गावातील काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी पाचोरा येथे दाखल केले असता डॉ. अमित साळुंखे यांनी त्यास मृत असल्याचे घोषित केले.

मयतावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अनिल चौधरी हा नामांकित पहिलवान होते. ते शेती व्यवसाय करुन गुरांचा व्यापार करीत होते. गेल्या वर्षीच त्याचा मोठा भाऊ सुनिल याचे निधन झाले होते. मयताचे पच्छात वृद्ध आई, एक भाऊ, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. धडक देणारा वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून घटनेप्रकरणी अज्ञात वाहन धारकाविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या