Sunday, November 27, 2022

मोटरसायकल डिव्हायडरवर धडकली; दोघे जागीच ठार, एक जखमी

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

- Advertisement -

मोंढाळे रोडवरील स्विमिंग पुलवरुन परत येतांना मोटरसायकल डिव्हायडरवर धडकल्याने बुलढाणा जिल्ह्यातील एक व पाचोरा शहरातील एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दि. ५ जुन रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक युवक जखमी झाला असुन त्याचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उमेर सत्तार बागवान (वय १७, रा. हिदायत नगर, चिखली जि. बुलढाणा), अयान खान आमिन खान (वय १५, रा. तकीया मुल्लावाडा, पाचोरा), साहिल सलिम शेख (वय १५, रा. अक्सानगर, पाचोरा) हे दि. ५ जुन रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एम. एच. २० डी. झेड. २९४१ या होंडा शाईन मोटरसायकलने मोंढाळा रोडवरील स्विमिंग पुलवर पोहण्यासाठी गेले.

दरम्यान स्विमिंग पुलवरुन परत येत असतांना शहरातील जळगांव चौफुलीजवळील साईनाथ मार्बल समोर त्यांची मोटारसायकल डिव्हायडरवर जोरदार धडकल्याने या अपघातात उमेर सत्तार बागवान व अयान खान अमिन खान या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर साहिल सलिम शेख हा युवक जखमी झाला असुन त्याचेवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयतांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील व पोलिस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नलवाडे हे करित आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या