पाचोऱ्यात भीषण अपघात.. मामा- भाचा ठार

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पाचोऱ्यात भीषण  अपघातात मामा भाचा जागीच ठार झाला आहे. शहरातील भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर सोमवारी दि. २० जानेवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी व दुचाकीवरील दोघांना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने या भीषण अपघातात मामा-भाचा अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.  या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर राठोड (वय ३६) व संकेत राठोड (वय १९, दोन्ही रा. चंडिकावाडी ता. चाळीसगाव) असे मयत मामा व भाच्याचे नाव आहे. सोमवारी  पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भडगावकडून चाळीसगावकडील चंडिकावाडी तांडा या गावाच्या दिशेने जाणाऱ्या त्यांच्या दुचाकीस भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीवरील ज्ञानेश्वर व संकेत या दोन्ही मामा भाच्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान  घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केला. डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दिनेश भदाणे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.