Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    • पुस्तके वाचा, श्रीमंत व्हा..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»गाळण बु” येथे विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
    ताज्या बातम्या

    गाळण बु” येथे विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 10, 2022Updated:June 10, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

    तालुक्यातील गाळण बु” येथील एका ४६ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करत असतांना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या वर्षीच्या पहिल्याच पावसाने निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    ९ जुन रोजी सायंकाळी ५:३० वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी गाळण बु” ता. पाचोरा येथील कैलास बारकु पाटील (वय ४६) हे आपल्या शेतीच्या कामात व्यस्त होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक विजांचा जोरदार कडकाडात होवुन मोठा आवाज झाला. याप्रसंगी कैलास पाटील यांच्या शेजारीच विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

    यावेळी काही अंतरावर त्यांच्या पत्नी देखील शेतात काम करत होत्या. त्यांनी एकच आक्रोश करत ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. मयत कैलास बारकु पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.

    यावर्षीच्या पहिल्याच पावसाने निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मयत कैलास बारकु पाटील यांचे पाश्चात्य पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पाचोरा पोलिस पुढील तपास करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #pachora Galan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif