पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
खडकदेवळा बु.ता.पाचोरा येथे साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या कार्यालयात महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य ग्रंथालय व संचालनालयाच्या आदेशाने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा”, “वाचन प्रेरणा उपक्रम” चे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक भिला ब्राह्मणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे पोलीस पाटील एकनाथ कोळी, वाचनालयाचे विश्वास पाटील, संजय निकम, देवचंद गायकवाड, डॉ. यशवंत पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. यशवंत पाटील यांनी मराठी भाषेचे महत्त्व व संवर्धनाचे उपायाबाबत माहिती देवून सांगितले की मराठी भाषेत आपले अधिकाधिक व्यवहार करावेत. मराठी पुस्तके, कथा, कादंबऱ्या वाचाव्यात. यानंतर मराठी भाषेविषयी भिला ब्राह्मणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भाषेवरून आपली ओळख ठरते मराठी भाषा ही अतिप्राचीन आहे. मातृभाषेतून एखादी गोष्ट समजणे किंवा बोलणे हे अगदी सहजपणे होते. आज जागतिकीकरणाचे युग असुन तरी पण आपण आपल्या मातृभाषेला विसरू नये. मराठी भाषेचा आपण सर्वांनी अभिमान बाळगायला हवा. मराठी भाषा ही श्रेष्ठ आहे तिला अभिजात दर्जा मिळायला हवा.
मराठीचा मान सन्मान करून तिचा प्रचार व प्रसार करावा. दैनंदिन जीवनातील मराठी भाषेचा वापर वाढवून मराठी भाषेतून लेखनाला प्रोत्साहन दयावे व मराठी आपली मायबोली हे ब्रीदवाक्य सार्थक करावे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालय माहिती कार्यालयाच्या व जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या आदेशाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित वाचन प्रेरणा उपक्रमात ते उद्घघाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी शाळेतील मुला मुलींना त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमास यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग, महीला व मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचलन संजय निकम यांनी तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील एकनाथ कोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उत्तम खर्देकर, शांताराम पाटील, विकास देवरे, सुदाम देवरे, रघुनाथ निकम, शांताराम टेलर, संदीप देवरे, प्रकाश सुर्यवंशी, बापू देवरे, दत्तात्रय मोरे, दत्तू शिंपी, लक्ष्मीकांत सोनवणे, सुरेश कोळी, पांडूरंग शींपी, अनिल शिंपी, शुभम अरविंद पाटील, पुष्पा शिंदे, कलाबाई देवरे, भिकू मोरे, सुनंदा पाटील वाचनालयाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.