धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली आल्याने ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज २ डिसेंबर रोजी पहाटे २:४० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

सदरची घटना पाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७३ / ३ डाऊन लाईननजीक घडली असुन घटनेची माहिती मिळताच पाचोरा लोहमार्ग दुरक्षेत्र पोलिस स्टेशनचे ए. एस. आय. गोपाळकृष्ण सोनवणे हे रुण्गवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी जावुन पंचनामा केला.

मयताचे अंदाजे वय ४० वर्ष असुन मयताचे अंगावर निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, काळे – पिवळे पट्टे असलेला टि – शर्ट आढळुन आला आहे. मयताचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून मयताबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात संपर्क साधावा असे आवाहन पाचोरा रेल्वे पोलिसांनी केले आहे.

घटनेचा पुढील तपास ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल गोपाळकृष्ण सोनवणे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.