Saturday, December 3, 2022

पाचोऱ्यात रामदास कदमांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

- Advertisement -

राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे परिवाराबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत आज सकाळी शहरातील “शिवतीर्थ” या शिवसेना कार्यालयापासुन ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पाचोरा तालुका शिवसेना – संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रामदास कदम यांचे निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत, चपला बुटांचा हार घालत सदरचा पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -

- Advertisement -

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत, उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण साहेबराव पाटील, तालुका अध्यक्ष जिभाऊ पाटील, मा. नगरसेवक दादाभाऊ चौधरी, दत्तात्रय जडे, खंडु सोनवणे, उपशहरप्रमुख अनिल सावंत, भरत खंडेलवाल, पप्पु राजपुत, संदिप जैन, पप्पु जाधव, प्रविण मोरे, हरीष देवरे, अतुल चौधरी, संजय चौधरी, नाना वाघ, रविंद्र चौधरी, राजेंद्र राणा, अजय पाटील, अमरसिंग पाटील, अनिस अन्वर, देविदास पाटील, अनिल मराठे, विलास पाटील, प्रितेष जैन, धनराज पाटील सह शिवसेना, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तद्नंतर रामदास कदम यांच्या निषेधाचे निवेदन तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या