मोठ्या भावाच्या विरहाने ४८ तासातच लहान भावाचा मृत्यू

0

 पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

पाचोरा तालुक्यातील निंभोरी खु” येथील माजी पोलिस पाटील कै. तुळशिराम नारायण दिवटे यांचा मोठा मुलगा गजानन तुळशिराम दिवटे (वय ३३) याचे मंगळवारी दि. २० रोजी पहाटे पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा लहान भाऊ राहुल तुळशिराम दिवटे हे गेल्या सहा महिन्यांपासून आजाराशी झुंज देत असतांना मोठ्या भावाचे निधन झाल्याने त्याचा धसका घेऊन राहुल दिवटे (वय ३१) यांचे गुरुवारी सकाळी तीन वाजता अवघ्या ४८ तासांच्या अंतराने निधन झाले.

गजानन दिवटे यांच्या सारीचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता आटोपल्यानंतर दुपारी बारा वाजता राहुल यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे निंभोरी गावावर शोककळा पसरली आहे. गजानन यांच्या पश्चात आई, एक मुलगा, एक मुलगी, तर राहुल यांच्या पश्चात आई, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.