भोजे येथील अवैध मद्य विक्रेत्यावर कारवाई

0

भोजे येथील अवैध मद्य विक्रेत्यावर कारवाई

पाचोरा : तालुक्यातील भोजे येथे अवैध देशी- विदेशी मद्य विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या १७हजार ७७५ रुपयांची दारु जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव हरेश्वर येथील स.पो.नि. कल्याणी वर्मा यांना भोजे गावात एक तरुण अवैधपणे मद्य विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर स.पो.नि. वर्मा यांनी पो.हे.कॉ. काजीम देशमुख, पो.ना. दीपक अहिरे, पो.कॉ. प्रतिक गाढे, पो.कॉ. मुकेश लोकरे, पो.कॉ. विकी इंगळे यांनी भोजे येथे जावून खात्री करुन त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी भोजे येथील दीपक भिसे याच्यावर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पो.हे.कॉ. शांतीलाल पगारे करत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.