Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पाचोरा नगरपालिकेवर शिवसेना झेंडा
    ताज्या बातम्या

    पाचोरा नगरपालिकेवर शिवसेना झेंडा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 21, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा नगरपालिकेवर शिवसेना झेंडा

    नगराध्यक्ष पदासह २२ नगरसेवकांचा विजयश्री

    पाचोरा प्रतिनिधी पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातर्फे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी नगराध्यक्ष पदासाठी तर पत्र प्रभाग क्रमांक ९ मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात होते. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनिता किशोर पाटील यांचा ११ हजार ३४८ मतांनी विजय झाला तर सुमित किशोर पाटील हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात असताना त्यांना २४७३ मते मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन मालोजीराव भोसले यांना केवळ ९३६ मतांवर समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता दिलीप वाघ यांचा नगराध्यक्ष पदासाठी ११ हजार ३४८ मतांनी पराभव झाला. विद्यमान नगरसेवक व माजी आमदार दिलीप यांचे सुपुत्र भूषण दिलीप वाघ यांनी प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक लढविली त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले व प्रथमच निवडणूक लढविलेले किशोर गुणवंतराव बारवकर यांना १८०८ तर भूषण वाघ यांना ९२७ मते मिळाले असल्याने बारवकर यांनी भूषण वाघ यांचा ८७३ मतांनी पराभव केला. मात्र दिलीप वाघ त्यांचा पुतण्या व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांचे पुत्र सुरज संजय वाघ यांनी प्रभाग क्रमांक १० मधून निवडणूक लढवली होती त्यांचा केवळ १९ मतांनी विजय झाला. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुनीता किशोर पाटील यांना २५८११ मते व ५४ पोस्टल मतदान मिळून २५ हजार ८६५ मते मिळाली तर भाजपाच्या सुचेता दिलीप वाघ यांना १४ हजार ५१० मते तर सात पोस्ट मतदान मिळून १४ हजार ५१७ मते मिळाले म्हणजेच सुचता वाघ यांचा ११ हजार ३४८ मतांनी पराभव झाला. यात २१ मतदारांनी नोटांना पसंती दिली.

    नगरसेवक पदाच्या निवडणुकीत सुमित किशोर पाटील यांना सर्वाधिक तर सुरत संजय वाघ यांना सर्वात कमी मतदानाने विजय
    आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोर पाटील यांनी प्रभाग क्रमांक – ९ – अ मधून नगरसेवक पदाचे निवडणूक लढली होती पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांना २४७३ सर्वाधिक मतदान मिळवण्याचा विक्रम नोंदविला तर सुरत संजय वाघ यांनी प्रभाग क्रमांक दहा अ मधून निवडणूक लढले असता त्यांना १६७३ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अॅड. योगेश जगन्नाथ पाटील यांना १६५४ मतदान मिळाल्याने यात सुरज वाघ यांचा १९ मतांनी विजय झाला. निवडणुकीनंतर विजय उमेदवारांच्या ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढून कार्यकर्त्यांनी गुलाल, निळ उधळत शहरात जल्लोषात मिरवणुका काढल्या.

    चुका सुधारून पुन्हा जोमाने काम करू-अमोल शिंदे
    पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला २८ पैकी केवळ ०६ जागा मिळाल्या, जनतेचा हा कौल आम्हास मान्य असून आमच्या काही चुका झाल्या असतील त्यावर चिंतन करून चुका सुधारक पुन्हा जोमाने काम करू, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा पराभव झाला असून दडपशाही व गुंडगिरीचा विजय झाल्याची माहिती भाजपाचे नेते अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले.

    जनतेने विकासाला मतदान केले -आमदार किशोर पाटील
    मी जे बोलतो ते करून दाखवतो माझ्या एक नंबर रोजी झालेल्या वाढदिवसाला मी काही आश्वासने दिली होती त्याच्या पूर्णत्वाकडे जात असून जनतेने पाचोरा व भडगाव पालिकेत झालेला विकास पाहिलेला आहे, गेल्या लोकसभा निवडणुकीत युती म्हणून आम्ही प्रामाणिकपणे काम केले मात्र पुढील तीनच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता त्यांनी माझ्या विरोधात दोन वेळा अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांना उभे करून त्यांना रसद पुरवली , यामुळे सर्व जनता जनार्दन सुज्ञ असल्याने आज पाचोरा व भडगाव नगरपरिषदेत शिवसेनेचा भरघोस मतांनी विजय झाला काही दिलेल्या संस्थेने अपूर्ण असून काहीच दिवसात पाचोरा शहरवासीयांना दररोज पिण्याचे पाणी देण्याचे मी आश्वासन दिले असून ते त्वरित पूर्ण करणार आहे, यावेळी नगराध्यक्ष सुनिता किशोर पाटील यांनीही पत्रकार परिषदेत निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासने पूर्ण करणार असल्याचे सांगितले यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
    गेल्या १५ वर्षापासून पाचोरा नगरपरिषदेत असलेली सत्ता व १२ वर्षांपासून पाचोरा – भाडगाव मतदार संघाचे आमदार असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात विकास केल्याने व कार्यकर्त्याची मोठी फळी असल्याने विकास कामांच्या जोरावर जनतेचा संपादित केलेला विश्वासाच्या भरवशावर आमदार किशोर पाटील यांनी गेल्या निवडणुकीच्या मानाने नगराध्यक्षांना मिळालेली दुपटीचे मते आणि नगरसेवक दुपटीने निवडून आणले आहेत, राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी पाचोरा पाचोरा नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण लक्ष घातले होते तर चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांनी पाचोरा शहर दत्तक घेतले होते. याशिवाय स्थानिक भाजपाचे नेत्यांमध्ये माजी आमदार दिलीप वाघ, भाजपाचे नेत्या वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे यांनी निवडणुकीत जीव ओतून काम केले असतानाही अखेर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार तथा आमदार किशोर पाटील यांच्या अर्धांगिनी सुनीता किशोर पाटील यांचा ११ हजार ३४८ मतांनी विजय झाला,
    गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय गोहिल यांचा केवळ ११०० मतांनी विजय झाला होता. तर शिवसेनेचे ११, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ तर भाजपा पुरस्कृत विकास आघाडीचे ७ नगरसेवक निवडून आले होते. मात्र यावेळी शहराचा मोठा विकास झाल्याने मतदानातही दुपटीचा फरक पडून सुनीता किशोर पाटील यांना मते मिळाली तर २८ पैकी२२ नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले तर दुसरीकडे भाजपाला केवळ सहा नगरसेवक पदावर समाधान मानावे लागले.

    या नगरसेवकांचा झाला पराभव
    अमोल शिंदे यांचे काका एक वेळा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविलेले विद्यमान नगरसेवक सतीश शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ यांचे सुपुत्र विद्यमान नगरसेवक भूषण वाघ, विद्यमान नगरसेवक राम केसवाणी, वासुदेव महाजन, मालती बापू हटकर या नगरसेवकांचा या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

    एकाच प्रभागात पती-पत्नी झाले विजय
    प्रभाग क्रमांक सात मधून माजी नगरसेवक सतीश शिंदे ह भारतीय जनता पक्ष तर्फे निवडणूक लढले होते त्यांचे विरोधात जनरल जागेसाठी निवडणूक लढविलेले प्रवीण ब्राह्मणे व त्यांच्या पत्नी वर्षा प्रवीण ब्राह्मणे हे पती-पत्नी शिवसेना शिंदे गटाकडून निवडून आले आहेत.

    भाजपाचे सहा उमेदवार विजयी
    पाचोरा नगरपरिषदेत नगराध्यक्ष पद व १४ प्रभागातून २८ नगरसेवकांसाठी निवडणूक झाली यात शिवसेना शिंदे गटाचे २२ तर भाजपाचे कविता विनोद पाटील, सुरत संजय वाघ, देशमुख अम्रीन अब्दुल रहमान, राहुल अंकुश गायकवाड (भाजपा पुरस्कृत उमेदवार) , कविता उमेश आटकर व गोपालदास अर्जुनदास वाधवाणी असे सहा उमेदवार निवडुन आले आहेत.
    पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाला नगराध्यक्षसह २२ जागेवर विजय…तर भाजपाला केवळ ६ जागांवर समाधान
    शहर प्रतिनिधी / पाचोरा
    पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला नगराध्यक्षा सह २२ जागांवर विजय मिळविला तर भाजपाला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी उबाठा सेनेसह काॅंग्रेसचे देखील उमेदवार निवडणूक रिंगणात होते मात्र त्यांना खातेही उघडता आले नाही. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनिता किशोर पाटील यांना २५८६४ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपाच्या सुचेता दिलीप वाघ यांना १४५१७ मते मिळाल्याने त्या ११३४८ मतांनी पराभूत झाल्या.
    शिवसेनेचे विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते व मताधिक्य)
    प्रभाग क्रमांक १ – मनिषा सुरेंद्र बाविस्कर (१४८०) (विजयी – २३७)
    बारावकर किशोर गुणवंत (१८०८) (विजयी – ८३१), प्रभाग क्रमांक २ – संजय नाथालाल गोहील (२०२३) (विजयी १२१४), चौधरी वैशाली छोटुलाल (१५५३) (विजयी – २८८), प्रभाग क्रमांक – ३ सतिष पुंडलिक चेडे (१३७९) (विजयी – २७८), प्रभाग क्रमांक – ४ बागवान रफिक गफ्फार (१५२७) (विजयी – ६५८), शेख रशिदाबी शब्बीर (१५१८) (विजयी – ४३५), प्रभाग क्रमांक – ५ बागवान खनसा सलिम (११९८) (विजयी – ५२६), चौधरी संजय त्र्यंबक (१४१४) (विजयी – ४६९), प्रभाग क्रमांक – ६ – तडवी रहेमान बिस्मिल्ला (१४८९) (विजयी – ५१६), प्रांजल सुमित सावंत (१५६९) (विजयी – ७२५), प्रभाग क्रमांक – ७ वर्षा प्रविण ब्राह्मणे (१६१२) (विजयी – ४५०), प्रविण हरिश्चंद्र ब्राह्मणे (१४९६) (विजयी – ३२२), प्रभाग क्रमांक – ८ – मिनाक्षी संजय एरंडे (१७६५) (विजयी – ७८६), गणेश भिमराव पाटील (१६९६) (विजयी – ७१५), प्रभाग क्रमांक – ९ – सुमित किशोरआप्पा पाटील (२४८३) (विजयी – १५३४), दिपाली किशोर पाटील (२०३६) (विजयी – ८०५), प्रभाग क्रमांक – १० – जयश्री नरेंद्र पाटील (१७५४) (विजयी – १९४), प्रभाग क्रमांक – १२ – प्रियंका वाल्मिक पाटील (२१९५) (विजयी – १३७१), संदिप रामदास पाटील (१५७७) (विजयी – १००), प्रभाग क्रमांक – १४ – वाघ प्रदिप भगवान (१६७४) (विजयी – ६३२), सुरेखा अशोक पाटील (१४४३) (विजयी – ६९)

    भाजपाचे विजयी नगरसेवक
    प्रभाग क्रमांक ३ – अ – कविता विनोद पाटील (१३६३) (विजयी – ८३), प्रभाग क्रमांक – १० – अ – सुरज संजय वाघ (१६७३) (विजयी – १९), प्रभाग क्रमांक – ११ – अ – देशमुख अमरीन अब्दुल रहेमान (१४९७) (विजयी – २३२), प्रभाग क्रमांक ११ – ब – भाजपा पुरस्कृत राहुल अंकुश गायकवाड (१४८७) (विजयी – ४३९), प्रभाग क्रमांक १३ – कविता उमेश हटकर – (१७७५) (विजयी – ५६१), गोपालदास अर्जुनदास वासवानी (विजयी – २८५)
    ‎

    ‎

     

     

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif