पाचोऱ्यात आ. किशोर पाटलांच्या हस्ते भरडधान्य खरेदीचे काटापुजन

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा व भडगाव तालुक्यात पणन खरीप हंगाम २०२१ – २२ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदीला दि. २४ जानेवारी पासुन सुरुवात झाली असून आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते येथील शासकीय गोदामाजवळ काटा पुजन करुन शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मा. आ. दिलीप वाघ, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरूडे, पुरवठा विभागाचे अव्वल कारकून अभिजीत येवले, गोडाऊन व्यवस्थापक नितीन निकम, शेतकी सहकारी संघाचे चेअरमन सुनिल पाटील, बाजार समितीचे प्रशासक रणजीत पाटील, किशोर डोंगरे, मच्छिंद्र जाधव, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील सह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाचोरा व भडगाव येथील भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करावीत या बाबत आ. किशोर पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. भरड धान्य खरेदी केंद्र विशेष बाब म्हणून तात्काळ सुरू करण्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी दि. १७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून विनंती केली होती. याची तात्काळ दखल घेत दि. २४ रोजी आ. किशोर पाटील यांच्या हस्ते खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात सन – २०२१ मध्ये उद्भवलेल्या अतिवृष्टी व वादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्यात आले आहे. परंतु या नुकसानी मधून वाचलेला उर्वरित सुमारे ३० ते ३५ टक्के शेतमाल शेतकऱ्यांकडे पडून आहे सदरील शेतमाल शासनाने खरेदी केल्यास शेतकरी बांधवांना आर्थिक मदत होईल या भावनेतून आ. किशोर पाटील यांनी पाठपुरावा केला होता. भरड धान्य खरेदी केंद्र सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.