Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    • होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती
    • वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास शासन अपयशी?
    • भुसावळमध्ये 21 किलो गांजा जप्त; सख्ख्या भावांना अटक
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»दुर्देवी.. शेततळ्यात बुडुन दोन तरुणांचा मृत्यू
    जळगाव जिल्हा

    दुर्देवी.. शेततळ्यात बुडुन दोन तरुणांचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क 

     

    पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील शेती शिवारातील शेततळ्यात बुडुन एका २१ वर्षीय व एका १४ वर्षीय तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच रुग्णवाहिका चालक निळकंठ पाटील व सागर पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी दोघांना मृत घोषित केले.

    पदमसिंह भगवान पाटील (वय २१, रा. अंतुर्ली बुद्रुक ता. पाचोरा) व रविंद्र परभत कोळी (वय १४, रा. पुनगाव ता. पाचोरा)  हे शेत मजुरी करुन आपल्या परिवारास आर्थिक पाठबळ देत होते. दरम्यान आज ८ मे रोजी सकाळी ८ वाजता पदमसिंग पाटील व रविंद्र कोळी हे कामावर गेले होते. खुप वेळ झाला तरी घरी परत न आल्याने ग्रामस्थांनी दोघांचा शोध सुरू केला असता सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अंतुर्ली शेत शिवारातील एका शेत तळ्यात दोघांचे मृतदेह आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली.

    ग्रामस्थांच्या मदतीने व रुग्णवाहिका चालक निळकंठ पाटील व सागर पाटील यांच्या साहाय्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी एकाच वेळी दोघांना मृत घोषित केले. पदमसिंग पाटील याचे पश्चात्य वृद्ध आई, एक विवाहित बहिण व रविंद्र कोळी याचे पश्चात्य आई, वडिल, दोन भाऊ असा परिवार आहे.

    घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दोघ तरुणांचा मृत्यु शेततळ्यात पाय घसरून पडल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडुन व्यक्त करीत आहे.

    #pachora
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

    May 15, 2026

    सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!

    May 15, 2026

    आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप

    May 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif