वृद्धाची गळफास लावून आत्महत्या

अक्षय तृतीयेलाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

शहरातील मानसिंगका काॅलनीतील एका ६३ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील मानसिंगका काॅलनीतील रहिवाशी भरत नारायण पाटील (वय ६३) या वृद्धाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. सदरचा प्रकार मयत वृद्धाच्या मुलाच्या लक्षात येताच त्याने हंबरडा फोडला. घटनास्थळी पोलिस पथक दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा करून भरत पाटील यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले.

घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरत पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले ? याचा शोध पाचोरा पोलिस घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.