पाचोर्‍यात साडेबावीस लाखांचा गुटखा पकडला

0

पाचोर्‍यात साडेबावीस लाखांचा गुटखा पकडला

पाचोरा लोकशाही न्युज नेटवर्क
शहरात गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे वाहन पकडले. सुमारे २२ लाख ५४ हजार रुपयांच्या गुटख्यासह ८ लाख रुपयांचे वाहन जप्त करत वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा शहरात वरखेडी नाका येथे गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश भदाणे, पो. हे. काॅ. राहुल शिंपी, वाहन चालक पो. काॅ. समीर पाटील, सुनिल पाटील, होमगार्ड संजय पाटील या पथकाने भडगाव कडुन वरखेडीच्या दिशेने जाणारे वाहन क्रं. एम. एच. ५२ – ००३४ हे जात असतांनाच पथकाने वाहनात काय आहे अशी विचारणा केली असता चालक हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने वाहनाची झडती घेतली असता. महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटख्याच्या गोण्या आढळुन आल्या. पथकाने संबंधित वाहन, २२ लाख ५४ हजार रुपयांच्या गुटख्याच्या गोण्या व ८ लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करत वाहन चालक दत्तु लालदास बैरागी (वय – ३१) रा. इंदिरा गांधी सिंधी शाळे जवळ, सिंधी काॅलनी, चाळीसगाव यास ताब्यात घेत त्याचे विरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे अवैधरित्या गुटखा वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.