विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने दोन एकर ऊस जळुन खाक

शेतकऱ्याचे साडेचार लाखांचे नुकसान

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क              

पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे शेत शिवारातील दोन एकर उसाला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीत उभ्या ऊसासह पाईप लाईन, ठिबकच्या नळ्या जळुन खाक झाल्याची घटना घडली. यामुळे शेतकऱ्याचे साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तात्काळ पाचोरा येथील दोन फायर बंब व भडगाव येथील एक फायर बंब दाखल होवुन आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील व्यापारी संजय सिसोदिया यांची बांबरुड महादेवाचे शिवारात शेत गट क्रं. १३९ / २ ही शेत जमिन आहे. या शेत जमिनीच्या दोन एकरमध्ये संजय सिसोदिया यांनी पाईपलाईन करुन ठिबक सिंचनाद्वारे ऊस लावलेला होता. ऊस कापणीसाठी आलेला असतांनाच ३ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास लावलेल्या ऊसाच्या वरील बाजुने विजेच्या तारा गेलेल्या आहेत. या विजेच्या तारांचा स्पर्श होवुन शार्ट सर्किटमुळे मोठा आगेचा गोळा ऊसाच्या मळ्यात पडताच मोठी आग लागली.

या आगीत ऊसासह पाईप लाईन व ठिबक संच पुर्णतः जळुन खाक झाले. घटनेची माहिती संजय सिसोदिया यांना कळताच त्यांनी व त्यांचे मुलाने तात्काळ अग्निशमन दलास पाचारण केले असता पाचोरा येथील दोन व भडगाव येथील एका बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तो पर्यंत दोन एकर मधील ऊस, पाईप लाईन व ठिबक सिंचन संच पुर्णतः जळुन खाक झाले होते. घटनास्थळी विज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित तलाठी यांनी भेट देवुन पंचनामा केला. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.