दुर्देवी.. सासऱ्याच्या घरी जावयाचा मृत्यू

मकर संक्रांतीच्या दिवशीच गावात हळहळ

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वत्र आनंदात असताना कुरंगी गावात दुःखद घटना घडली आहे. कुरंगी ता. पाचोरा येथील रहिवाशी असलेले व २५ वर्षापासून नोकरी निमित्ताने कल्याण येथे राहणारे विनोद धनराज पाटील (वय ५२) हे कल्याण (मुंबई) येथील गजानन माध्यमिक विद्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते. सेवानिवृत्तीची पाच वर्षे बाकी असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला असून मकर संक्रांतीच्या दिवशीच त्यांची प्राणज्योत मालवल्याने कुरंगी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

१३ जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता कल्याण स्टेशन वरून रेल्वेने पत्नी व मुलासोबत सुरत येथे सासऱ्यांना मकर संक्रांतीनिमित्त भेटण्यासाठी गेले असता सुरत उधना येथे त्यांचे सासरे राहत असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी पत्नी सीमा पाटील मुलगा जयेश (वय २०)  यांना सोबत घेऊन निघाले होते. १४ रोजी रात्री दीड वाजता सासऱ्याच्या घरी पोहोचले. १४ रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान विनोद पाटील यांच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्याने त्यांना तात्काळ त्यांचे मेहुणे यांनी त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलविले तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तेथून ताबडतोब त्यांना मोठ्या हॉस्पिटलला दाखल केले तेथे डॉक्टरांनी उपचार करून त्यांना त्वरित ऑपरेशन  करण्याचा सल्ला देऊन ऑपरेशन करण्याची तयारी केली मात्र ऑपरेशन करताना त्यांची प्राणज्योत मावळली.

मकर संक्रांतीच्या दिवशी ही घटना घडल्याने कुरंगी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. विनोद पाटील यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत ते अशोक जैन यांच्या गाडीचे चालक दिनकर पाटील, कुरंगी गावचे माजी उपसरपंच गुलाब पाटील यांचे चुलत बंधू होते. त्यांचेवर १५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता कुरंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.