डायल ११२ वर कॉल करुन दिली खोटी माहिती

पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पाचोरा पोलीस स्टेशनला २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजुन २५ मिनिटांनी डायल ११२ वर अज्ञात इसमाने मोबाईलवरुन फोन करुन माहिती दिली की,  पाचोरा शहरातील जारगाव चौफुली वर १५० ते २०० लोक विशीष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहे.  त्यापैकी २ लोकांचा मर्डर झालेला आहे.  त्यात चॉपर सारख्या हत्याराचा वापर करण्यात आलेला आहे.  तात्काळ पोलीस पाठवा बाबत फोन आलेला होता.

सदर माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचा स्टाफ रात्री उशिरा पर्यंत निवडणुकीचा महत्वाचा बंदोबस्त करुन सकाळी पुन्हा कर्तव्यावर हजर होताच आलेल्या कॉलचे गांभीर्य ओळखुन पाचोरा पोलीस ठाणे कडील पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी जावुन मिळालेल्या माहिती प्रमाणे सखोल चौकशी करता फोन केल्याप्रमाणे सदर ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नव्हती.  फोन केलेल्या इसमाचा मोबाईल नंबर वरुन शोध घेतला असता शैलेश रविंन्द्र पाटील रा.  तामसवाडी ता.  पारोळा जि.  जळगाव हल्ली मुक्काम रा.  जारगाव चौफुली,  पाचोरा हा मिळून आला.

दरम्यान त्यास घटनेबाबत विचारपुस करता त्याने कळवले की,  मी मुददामहून पोलीस स्टेशनला फोन केलेला होता.  तशी काही एक घटना घडलेली नाही.  शैलेश रविंन्द्र पाटील रा.  तामसवाडी ता.  पारोळा जि.  जळगाव याने नागरीकांना व पोलीसांना त्रास व्हावा या हेतुने मुददामहून पोलीसांना डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती दिल्याने शैलेश पाटील याचे विरुध्द २४ नोव्हेंबर रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील हे करीत आहे.  नागरीकांना आवाहन करण्यात येते की,  महाराष्ट्र पोलीस दलातर्फे डायल ११२ ही सुविधा महिला,  मुली व जेष्ठ नागरीकांकरीता गंभिर प्रसंगी तात्काळ मदत उपलब्ध होण्याकरीता सुरु करण्यात आलेली आहे.  तरी नागरीकांनी डायल ११२ वर गंभिर प्रसंगीच पोलीस मदतीकरीता कॉल करावा.  असे आवाहन पोलीसांकडुन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.