वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

बैल व वासरू जागीच ठार, नगरदेवळ्यातील धक्कादायक घटना

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क 

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील चुंचाळे शिवारात अंगावर वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पांडुरंग त्र्यंबक महाजन (वय ६५) असे मयत शेतकरी यांचे नाव आहे. पांडुरंग महाजन हे निवृत्त शिक्षक होते. पांडुरंग महाजन हे नेहमीप्रमाणे १८ रोजी आपल्या शेतात गेले असताना सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. यातच ही दुर्दैवी घटना घडली आहे. तर दुसरीकडे चुंचाळे येथे  प्रकाश चिंधा महाजन यांच्या शेतातील १ बैल २ वासरू देखील वीज कोसळल्याने ठार झाले आहेत.

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पांडुरंग महाजन हे त्यांच्या चुंचाळे शिवारातील शेतीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. दरम्यान, त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

 

बैल व वासरू जागीच ठार

तसेच नगरदेवळा परिसरात चुंचाळे शिवारात प्रकाश चिंधा महाजन यांच्या शेतातील एक  बैल दोन वासरे वीज कोसळल्याने जागीच ठार झाले आहेत. दरम्यान, नगरदेवळा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे परिसरात विजेचा प्रवाह खंडीत झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.