पाचोरा शहरात आ. किशोर पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सद्यस्थितीत राजकीय घडामोडींना वेग आल्याने पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुक लढवुन दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मात्र शिवसेनेवर नाराज असलेल्या मा. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा स्वतंत्र गट तयार करून शिवसेने समोर मोठं आव्हान ठेवले. एकनाथ शिंदे यांच्या गटात पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे देखील सहभागी आहेत. त्यांच्या या सहभागामुळे पाचोरा मतदार संघात काही दिवसांपासून उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.

यावेळी आ. किशोर पाटील यांचे खंदे समर्थक तथा स्वार्थापोटी का होईना आज दि. ३० जुन रोजी सकाळी ११:३० वाजता पाचोरा शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी मुकूंद बिल्दिकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, प्रा. गणेश पाटील, नगरसेवक सतिष चेडे, रहिमान तडवी, शहरप्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, बापू हाटकर, प्रविण ब्राम्हणे, राजेंद्र भोसले, रमेश पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत धनवडे, सलिम शेख, मतीन बागवान, बसीर शेख, फारुख मिस्तरी, सयीद मिस्तरी, नगरपरिषदेच्या गटनेत्या सुनिता किशोर पाटील, महिला आघाडीच्या बेबाबाई पाटील, उर्मिला शेळके, स्मिता बारवकर, जया पवार, मालती बापू हाटकर, संगिता आनंद पगारे, लता वाघ, प्रिती सोनवणे, सुनंदा महाजन, कल्पना पाटील, आमदार किशोर पाटील यांचे समर्थनार्थ पाचोरा शहर व तालुक्यातील सुमारे अडीच ते तीन हजार नागरीक छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शिवसेना कार्यालयाजवळ एकत्रीत जन्मल्यानंतर या ठिकाणी मुकूंद बिल्दिकर यांनी मार्गदर्शन केल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली कै. के. एम. (बापू) पाटील भाजीपाला मार्केट, जुने कोर्ट, देशमुखवाडी, सराफ बाजार, जामनेर रोड मार्गे पुन्हा शिवसेना कार्यालयाजवळ आल्यानंतर रॅलीचे विसर्जन करण्यात आले रॅलीत सुमारे एक हजार महिलांनी सहभाग नोंदविला.

पोलिस बंदोबस्तामूळे शहराला छावणीचे स्वरूप

पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे एकनाथ शिंदे यांचे गटात सामील झाल्यानंतर त्यांचे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात रॅली काढली होती. त्या बंदोबस्तासाठी पाचोरा, पिंपळगाव (हरेश्र्वर), पहूर, जामनेर व जळगाव येथील एक २१ पोलिसांचा तुकडी आल्याने पाचोरा शहराला छावणीचे स्वरूप आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.