अल्ट्रा मीडियाची मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री “अल्ट्रा झकास” लॉंच…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

१९८२ पासून मनोरंजन विश्वातील सर्वात अग्रगण्य ”अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट” तर्फे गुडी पाडव्या निमित्ताने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म “अल्ट्रा झकास” लॉंच करण्यात आले आहे. या द्वारे वापरकर्त्यांना अप्रतिम दर्जेदार कंटेंट पाहण्याचा आनंद घेता येणार असून, ओटीटी च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांसाठी नवनवीन चित्रपट, टीव्ही शो, वेबसिरीज, पाककला, लहान मुलांचे माहितीपट आणि इतर व्हिडिओ, अशी कंटेंट लायब्ररी उपलब्ध होणार आहे. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर ‘अल्ट्रा झकास’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘गांव आले गोत्यात १५ लाख खात्यात’ आणि ‘रौद्र’च्या खास प्रीमियरची घोषणा केली आहे.

‘अल्ट्रा झकास’ ओटीटी प्लॅटफॉर्म ची रचना मनोरंजन विश्वातील प्रगत तंत्रज्ञान आणि प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन करण्यात आली असून तुम्ही तुमचे आवडते शो कधीही, कुठेही आणि कोणत्याही डिव्हाइस द्वारे पाहू शकता. तसेच या प्लॅटफॉर्म द्वारे दर्शकांसाठी अखंड व अनुकूल इंटरफेस उपलब्ध करण्यासोबतच प्रेक्षकांना सहजतेने कंटेंट ब्राउझ करण्याची आणि पाहण्याची सुविधा प्रदान करते.

‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट चे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, आमचे नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट्रा झकास’ लॉंच करण्यास उत्सुक आहोत, जे आमच्या प्रेक्षकांना उच्च-गुणवत्तेचा मनोरंजनात्मक कंटेंट उपलब्ध करण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत.

अल्ट्रा झकास ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी, रोमान्स आणि विविध शैलींमधील कंटेंटचा विस्तृत संग्रह समाविष्ट करण्यात आला आहे. हा प्लॅटफॉर्म स्मार्टफोन, टॅब्लेट आणि स्मार्ट टीव्ही सहित सर्व प्रमुख उपकरणांवर उपलब्ध आहे.

‘अल्ट्रा झकास’ चे बिझनेस प्रमुख वेंकट गारापाटी, यांनी सांगितले, आमच्या टीम ने हा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी अथक परिश्रम केले आहेत जे आमच्या वापरकर्त्यांना एक उल्लेखनीय अनुभव देऊन जाईल. याशिवाय “प्रेक्षकांच्या सुखकर अनुभवासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंटेंट लायब्ररी पासून ते यूजर इंटरफेस पर्यंत सर्व तपशीलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.