
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्ह्य़ातील भद्रावतीत मोहरमच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे यंदाही विविध उत्सव कार्यक्रमांचे आयोजन भद्रावती मुहरम बहुउद्देशीय उत्सव समिती (सर्वधर्म समभाव) तर्फे करण्यात आले आहे. ६ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ते रात्री १० वाजेपर्यंत गांधी चौक येथे हा उत्सव पार पाडला जाणार असून, तालुक्यातील विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांतर्फे या आयोजनाला सहभाग असतो.
गांधी चौक परिसरात संपूर्ण चौकात विजेची रोशनाई, पताका, स्वागत गेट, ढोल-ताशे यांसारखी आकर्षक सजावट करण्यात येते. पारंपारिक आणि आधुनिक साजसज्जांच्या वातावरणात अनेक जाती-धर्माचे लोक दर्शनासाठी एकत्र येतात. यामध्ये विविध सामाजिक संघटनांतर्फे सरबत, लंगर, मिठाई, पिण्याचे पाणी आणि प्रसाद वितरणही होते. व्यापारी असोशियन, आटो असोशियन, पत्रकार आणि इतर सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग असतो.
भद्रावती तालुका, शहर आणि प्रत्येक वार्डातून सवाऱ्या, ख्वाज्या, ताजे, पंजे, डोले गांधी चौकात एकत्र येतात आणि याला जत्रेचे स्वरूप येते. गेल्या २० वर्षांपासून समितीतर्फे सद्भावना, भाईचारा, कौमी एकता, देशभक्ती आणि शांतता कायम ठेवण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
मोहरमच्या पहिल्या दिवशी उत्सवाला सुरुवात होते. चौथ्या आणि पाचव्या दिवशी सवाऱ्याची स्थापना होते तर सातव्या आणि नवव्या दिवशी रात्री सवाऱ्या व ख्वाज्या विविध दरग्यावर भेटी गाठी घेतात. या उत्सवाची सांगता मुहरमच्या दहाव्या दिवशी गांधी चौक येथे होते.
या दरम्यान उमेश रामटेके (माजी नगरसेवक, अध्यक्ष), राजू गैनवार (माजी नगरसेवक, सचिव), अनिल धानोरकर (माजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष), रब्बानी शेख (संघटक), निलेश पाटील (माजी नगरसेवक, कार्याध्यक्ष), प्रफुल चटकी (माजी उपाध्यक्ष), जावेद शेख, सागर जट्टलवार, प्रशांत बदखल, जगन दानव, खेमचंद हरीयानी, विलास गुंडावार, बाळू उपलंचीवार, संजय बॅनर्जी, प्रकाश पिंपळकर यांसारख्या नेतृत्वकर्त्यांनी या उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.

