Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भारतीय संस्कृतीत अवयवदानाला पौराणिक महत्व!
    जळगाव

    भारतीय संस्कृतीत अवयवदानाला पौराणिक महत्व!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 18, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : अवयवदान आणि देहदान या दोन्ही बाबी पुनरूज्जीवनासाठी पूरक असतात. भारतीय संस्कृतीमध्ये अवयवदानाला पौराणिक महत्व असल्याचे मत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केले. गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयातर्फे डॉ. केतकी पाटील सभागृहात अवयव दानावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
    यावेळी व्यासपीठावर नेफ्रोलॉजीस्ट डॉ. अमित भंगाळे, डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, कबचौ उमविचे अधीष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, मल्हारा कम्युनिकेशनचे संचालक आनंद मल्हारा, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. नरेंद्र ठाकूर, अवयवदानाबाबत जागृती करणारे किशोर सुर्यवंशी, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधीष्ठाता वैद्य हर्षल बोरोले उपस्थित होते.
    परिसंवादाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धन्वंतरी पूजन करण्यात आले. त्यानंतर किडनी दान करणाऱ्या लिला कोळी, किशोर सुर्यवंशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. उल्हास पाटील म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतिहासात असा कार्यक्रम झालेला नाही. अवयवदान परिसंवाद हा अद्वितीय कार्यक्रम आहे. अपने लिए तो सभी जीते है इस जहाँ मे, जिंदगी का मतलब तो औरो के काम आये असा शेर म्हणत डॉ. उल्हास पाटील आयुष्यात समाजाला अवयवदानाबाबत जागृत करण्याची जबाबदारी आपल्याला स्विकारायची असल्याचे ते म्हणाले. इच्छाशक्तीच्या बळावर किशोर सूर्यवंशी यांनी आंतरराष्ट्रीय रेकॉर्डमध्ये आपली नोंद केली आहे. अवयदानाला मोठी पौराणिक परंपरा आहे. महर्षी दधीची यांच्या अस्थिचे शस्त्र इंद्राने वापरून राक्षसांचा संहार केला होता. तेव्हापासून अवयवदानाची परंपरा आहे. परमवीर चक्राचे उगमस्थान दधीची ऋषी असल्याचे त्यांनी सांगितले.
    नेफ्रॉलॉजीस्ट डॉ. अमित भंगाळे यांनी अवयदानाबाबत सविस्तर माहिती विशद केली. तसेच अवयव दानानंतरची काळजी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. किशोर सूर्यवंशी यांनी अनुभव कथन केले. मृत्यूनंतर प्रत्येकाने अवयव दान केले पाहिजे असे मत डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केले. डॉ. अनिल डोंगरे, आनंद मल्हारा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी अवयव दानाबाबतची शपथ ग्रहण केली.

     

    यांची होती उपस्थिती
    या कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. चेतनकुमार पाटील, डॉ. साजीया शेख, डॉ. मयूरी चौधरी, डॉ. अंजना शिंदे, डॉ. विशाखा मोराणकर, डॉ. कोमल खंडारे, अमिता निकम, डॉ. कांचन चौधरी, डॉ. मुकेश चौधरी, रजीस्ट्रार चेतन चौधरी यांच्यासह आयुर्वेद महाविद्यालयाचे 200 विद्यार्थी उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif