आयुध निर्माणीच्या ६ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ?
दोन गलील सह ए. के ४७ च्या तीन रायफली चोरी प्रकरण
वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आयुध निर्माणीच्या फ्रुप टेस्टींग विभागातील शस्त्रगारातून पाच रायफली चोरी झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सहा कनिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुध निर्माणीच्या फ्रुप टेस्टींग विभागातून तयार झालेल्या बंदुकीच्या गोळ्याची चाचणी घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गलील रायफल व ए के ४७ रायफल्स ह्या शस्त्रगारात ठेवलेल्या पैकी पाच रायफल्स चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्याच्या तपास करण्यासाठी ए टी एस पथक , स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, स्थानिक पोलीस पथक चोरी गेलेल्या रायफली व चोराचा शोध शोध घेत असताना दि. २८ सोमवार रोजी वरणगाव स्टेशनपासून थोड्याच अंतरावर असलेल्या जाडगाव शिवारात रेल्वेच्या अप लाईनच्या मध्ये एक गलील व दोन ए के ४७ रायफल्स चाबी वाल्याच्या नजरेस पडल्या होत्या.
रेल्वे सुरक्षा दलासह स्थानिक गुन्हे शाखेचे व स्थानिक पोलीसांनी जाडगाव गाठत रायफली हस्तगत केल्या. मात्र चोरटे व दोन रायफलीचा आजूनही शोध लागत नसल्याने तपास यंत्रणांना शहरात ठाण मांडून आहे. तर या प्रकरणात निर्माणी प्रशासनाने चार व्यवस्था अधिकारी , फ्रुप टेस्टिंग विभागातील कनिष्ठ कार्यप्रबंधक , सुरक्षा कार्यप्रबंधकासह सहा अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याने निलंबित केल्याची चर्चा शहरात जोरदार चर्चा सुरू असली तरी निर्माणी प्रशानने या बाबत कुठलाच खुलासा केला नाही .
कर्मचाऱ्यांचा चौकशी
रायफली सापडल्यापासून निर्माणीने कठोर पावले उचलत निलंबनाचा बडगा उगारला आहे. तर निर्माणीची फ्रुप टेस्टींग, सुरक्षा विभाग, मोटर वाहन विभाग , विद्युत विभाग व ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याची वरणगाव पोलीस स्टेशनला सकाळपासूनच चौकशी करीत आहे