Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    महाराष्ट्र

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    प्रतिबंधित रंग, सुट्या मसाला पावडरची विक्री आणि इथिलीन ऑक्साइडच्या वापरावर निर्बंध
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2026No Comments176 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुंबई

    राज्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त मसाले उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ( एफडीए) मसाल्यांचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीसंदर्भात कठोर अनुपालन आदेश जारी केले आहेत. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, मसाला व्यवसायाशी संबंधित सर्व उत्पादक, व्यापारी, घाऊक व किरकोळ विक्रेते, ई-कॉमर्स व्यावसायिक, हॉटेल्स आणि केटरर्स यांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

    हळद, मिरची, धणे, जिरे, काळी मिरी, दालचिनी, हिंग आणि मिश्र मसाल्यांमध्ये मेटॅनिल यलो, रोडामाइन बी, सुदान डाईज, लेड क्रोमेट यांसारखे प्रतिबंधित रंग तसेच अन्य हानिकारक पदार्थ मिसळण्यास मनाई करण्यात आली आहे. मसाल्यांमध्ये विटांची भुकटी, खडू, लाकडाचा भुसा किंवा अन्य अनधिकृत पदार्थ मिसळणे, तसेच अर्क काढलेल्या मसाल्यांची विक्री करणे यावरही कारवाई केली जाणार आहे.

    मसाले सार्वजनिक रस्ते, डांबरी पृष्ठभाग, गटारे, कचराकुंड्या किंवा जनावरांच्या गोठ्यांजवळ वाळविण्यास मनाई आहे. उत्पादन व साठवणूक परिसर स्वच्छ, कोरडा आणि कीडमुक्त ठेवणे आवश्यक आहे. मसाला पावडर व मिश्र मसाल्यांची सुट्या स्वरूपातील विक्री प्रतिबंधित असून, उत्पादनस्थळी योग्य पद्धतीने पॅकिंग व सीलिंग करण्यावर भर देण्यात आला आहे. मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी इथिलीन ऑक्साइडचा वापर करण्यासही सक्त मनाई आहे. प्रत्येक व्यावसायिकाकडे व्यवसायाच्या स्वरूपानुसार वैध एफएसएसएआय परवाना किंवा नोंदणी असणे आवश्यक आहे. पॅकिंगवर उत्पादनाचे नाव, घटक, उत्पादकाचा तपशील, परवाना क्रमांक, बॅच क्रमांक आणि लागू वैधानिक माहिती नमूद करावी लागेल. पुराव्याशिवाय शुद्धता, नैसर्गिकता, सेंद्रिय उत्पादन किंवा आरोग्यविषयक दावे करता येणार नाहीत.

    भेसळ आढळल्यास कारवाई केवळ किरकोळ विक्रेत्यापुरती मर्यादित न ठेवता मूळ उत्पादक, पुरवठादार आणि भेसळीसाठी प्रतिबंधित पदार्थ पुरविणाऱ्यांपर्यंत तपास केला जाणार आहे. दोषाच्या गांभीर्यानुसार जप्ती, विक्री थांबविणे, उत्पादन परत मागविणे, परवाना निलंबित किंवा रद्द करणे आणि न्यायालयीन खटले दाखल करण्याची तरतूद आहे. मसाल्यांमध्ये भेसळ किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या तक्रार संकेतस्थळावर, १८०० २२२ ३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ‘फूड सेफ्टी कनेक्ट’ ॲपद्वारे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अन्न सुरक्षा आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif