Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    अपघात

    प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!

    तरुणाने गळफास घेत संपवले जीवन : मानसिक त्रास दिल्याचा आरोप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 6, 2026No Comments489 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    प्रेमसंबंधाला विरोध केल्याने वारंवार धमकावून मानसिक त्रास दिल्याच्या आरोपातून 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील देवळवाडा परिसरात घडली. प्रशांत संजय सोनवणे (वय 28, रा. देऊळवाडा, ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी 3 जणांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सोनवणे याची मावस बहीण रोशनी अशोक ठाकरे हिचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रेमसंबंधाला प्रशांतचा विरोध होता. याच कारणावरून संदीप महाजन, विशाल महाजन तसेच त्यांच्या आईकडून प्रशांतला वारंवार अडवून धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, प्रशांतला रस्त्यात अडवून तसेच विविध ठिकाणी त्रास देण्यात येत होता. या सततच्या त्रासामुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता, असा दावा करण्यात आला आहे. अखेर या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

    दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रशांतने आसोदा उड्डाणपुलाजवळील गवळी मुंजोबा मंदिराच्या मागील शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

    तक्रारीमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी केली जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण आणि संबंधित आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif