लोकशाही संपादकीय लेख
24 सप्टेंबर रोजी इंडियन एक्सप्रेसची बातमी निवडणूक आयुक्तांविरोधात आल्यानंतर 2 ऑक्टोबरपासून नवी दिल्ली येथे जंतर-मंतरवर काँग्रेससह नागरिक, तरुण यांचा एल्गार सुरू आहे. जंतर-मंतरवर चहूबाजूंनी बॅरिकेट लावण्यात आले. एकूण 11 मेट्रो रेल्वे स्टेशन बंद करण्यात आले आहेत. पण 2 ऑक्टोबरपासून ते आतापर्यंत तेथे आंदोलन चालू आहे. पोलीस, सैन्य, रॅपिड फोर्स तेथे तैनात करण्यात आला आहे. दिवसभर निदर्शने करण्यात येतात आणि संध्याकाळी ते निघून जातात, असा हा दिनक्रम चालू आहे. मुंबई येथे शिवाजी पार्क मैदानावर अक्रुज जनता पार्टीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, पण येथे जोरदार आंदोलने कॉक्रो जनता पार्टीकडून झाली. चार तारखेला ठाकरे बंधूंच्या मोर्चाला तुफान गर्दी होती. या मोर्चाची दखल वरपर्यंत घेण्यात आली आहे. आता विरोधी पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेतील 30 खासदार, जे लोकप्रतिनिधी या नात्याने आज मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी गेले, तेथेही पोलिसांनी निवडणूक आयुक्त कार्यालयाला कडे कोट बंदोबस्त केला होता. तुम्ही आज जायला परवानगी नाही, असे पोलिसांचे म्हणणे होते. पोलीस म्हणाले, तुम्हाला भेट घ्यायची असेल तर आयुक्तांची पूर्वपरवानगी घ्या आणि मगच तेथे मध्ये जा. तेव्हा विरोधी पक्षाचे खासदार म्हणाले, आम्ही त्या वेळा मागत आहोत, पण ते आम्हाला वेळच देत नाही. हा पोलीस आणि खासदारांमध्ये वाद चालू असताना राहुल गांधी बॅरिकेटवर चढले आणि हातात झेंडा घेऊन घोषणा द्यायला सुरुवात केली. तेव्हा घोषणांनी परिसर दुमडून गेला होता. हा वाद चालत असताना पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सर्व विरोधी पक्षातील खासदार यांना तेथे आलेल्या गाड्यांमध्ये बसायला सांगितले. त्यावेळी काही खासदार गेले आणि गाडीत बसले, पण काही खासदार तिथेच ठिय्या मांडून बसले. त्यावेळी ठिय्या मांडून बसलेल्या खासदारांना टांगा टोळी करून बसमध्ये बसविण्यात आले. परंतु निवडणूक आयोग कार्यालयापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या आकाशवाणी चौकात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी बसमधून खाली उडी मारून उतरून गेले. त्यांच्यासोबत काही खासदारही होते आणि हे सर्व आकाशवाणी चौकात ठिय्या मांडून बसले. आम्ही आता कोर्टातही जाणार नाही. आम्ही येथे सत्याग्रह करणार आहोत. जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट होणार नाही, तोपर्यंत आम्ही तेथे ठिय्या मांडून बसू, म्हणजेच सत्याग्रह करू, असे सांगितले. आकाशवाणी चौकात सध्या ते सत्याग्रहाला बसले आहे. तिथून निवडणूक कार्यालय 200 फुटांच्या अंतरावर आहे. संध्याकाळी हा अग्रलेख लिहीपर्यंत तरी तेथे सत्याग्रहाला सर्व बसलेले होते. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि आम्हाला निवडणूक आयुक्तांना भेटायचे आहे. आम्ही कसलीही गडबड करणार नाही. आम्ही निशस्त्र आहोत. त्यामुळे आम्हाला भेटायला का मनाई केली जाते आहे, हे समजत नाही. राहुल गांधी यांचे सर्व खासदारांसमोर जोरदार भाषण झाले. अनेक घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. तिरंगा आणि घोषणा असा प्रकार चालू होता. अडीच तास हा खासदारांचा संताप चालू होता, पण त्याला पोलीस बदले नाहीत. पोलिसांनी कडे बंदोबस्त केला होता. लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला एखाद्या अधिकाऱ्याला भेटायचे असेल तरी मज्जाव केला जातो, ही बाब अत्यंत वाईट आहे. लोकप्रतिनिधी खासदारांचे हे हाल आहेत, तर सर्वसामान्य जनतेचे काय होत असेल, याची कल्पनाच करवत नाही. गेल्या सहा दिवसांपासून 11 मेट्रो रेल्वे स्टेशन पूर्णपणे बंद आहे. त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची काय अवस्था होत असेल, ते तुम्हीच ठरवा. एक प्रवासाला जाणे-येणे नाही, तर तेथे व्यवसाय करणारे अनेक गरीब जनतेचे व्यवसाय गेल्या सहा दिवसांपासून बंद आहे. हातावर पोट असलेले हे विक्रेते कसे जगत असतील, केंद्र सरकारने काही विचार केला आहे का? जे मेट्रोने जाणारे-येणारे चाकरमाने आहेत, त्यांचे काय हाल होत असतील, याचाही विचार केलेला नाही. जंतर-मंतरवर आंदोलन करणारे लोक मिळेल त्या वाहनाने तेथे मात्र उपस्थिती देऊन आंदोलन करत आहेत.
परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मनाची नाही, तरी जनाची लाज वाटेल, असे कृत्य ज्ञानेश कुमार हे करत आहेत. त्यांनी राजीनामा द्यायला हवा. तरी पण तो दिला जात नाही. याचे कारण काय? त्यांना कोणाचे संरक्षण मिळते आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा ज्ञानेश कुमार यांना पाठिंबा असल्याशिवाय ते मूग गिळून गप्प बसू शकत नाहीत, हेच खरे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म सहामध्ये जे बदल केले आहेत, ते बदल सुप्रीम कोर्टाच्या परवानगीने केलेले आहेत, असे त्यांनी सांगितले होते. पण सुप्रीम कोर्टात याची काय सुनावणी दरम्यान मुख्य न्यायमूर्ती चंद्रकांत यांनी सांगितले की, फॉर्म सहामधील केलेले बदल हे सुप्रीम कोर्टाच्या परवानगीने केले गेलेले नाहीत, असे स्पष्टीकरण दिल्यामुळे खोटे बोलण्याचा एक ठपका ज्ञानेश कुमार यांना बसला आहे, यात शंका नाही. आता प्रामुख्याने सर्व विरोधकांकडून जी मागणी होते आहे, ती म्हणजे ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, फॉर्म सहामध्ये बदल करावे, एसआयआर पदवी पूर्णपणे नष्ट करावी आणि निवडणुका या बॅलेट पेपरवरच घ्यायला हव्यात, यावर विरोधक ठाम आहेत.

