Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»ब्रेकिंग.. मसूद अझहरच्या भावासह ५ मुख्य दहशतवादी ठार
    राष्ट्रीय

    ब्रेकिंग.. मसूद अझहरच्या भावासह ५ मुख्य दहशतवादी ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांना दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाच मोठ्या दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, या दशतवाद्यांची नावे आत समोर आली आहेत.

    खात्मा झालेल्या दहशतवाद्यांमध्ये मुदस्सर खादियान खास उर्फ ​​मुदस्सर उर्फ ​​अबू जुंदाल (लष्कर-ए-तैयबा), हाफिज मुहम्मद जमील (जैश-ए-मोहम्मद), मोहम्मद युसूफ अझहर उर्फ ​​उस्ताद जी उर्फ ​​मोहम्मद सलीम उर्फ ​​घोसी साहब (जैश-ए-मोहम्मद), खालिद उर्फ ​​अबू आकाशा (लष्कर-ए-तैयबा) आणि मोहम्मद हसन खान (लष्कर-ए-तैयबा) अशी भारतानं 7 मे रोजी केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या पाच मोठ्या दशतवाद्यांची नावे आहेत.

    ठार दहशतवाद्याची कुंडली

    1. मुदस्सर खादियान खास उर्फ ​​मुदस्सर उर्फ ​​अबू जुंदाल : हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मुरीदके येथील मरकज तैयबाचा प्रमुख होता. अबू जुंदालच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सैन्याकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. जुंदालच्या अंत्यसंस्कारात, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पंजाबचे आयजी (मरियम नवाज) यांनी पुष्पांजली अर्पण केली होती. अंत्यविधीला पाकिस्तानी लष्कराचे सेवारत लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी उपस्थित होते. अबू जुंदालने हा मुंबईत 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यातील दहशवाद्यांना प्रशिक्षण दिले होते.

    2.हाफिज मुहम्मद जमील : जैश-ए-मोहम्मदशी संबंधित जमील हा मौलाना मसूद अझहरचा मोठा भाऊ होता. ज्या दिवशी ऑपरेशन झाले, त्या दिवशी जमील बहावलपूरमधील त्याच्या घरी झोपला होता. जमील मरकज सुभानअल्लाहचा प्रभारी होता. जमील हा तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात आणि जैश-ए-मोहम्मदसाठी निधी उभारण्यात सक्रियपणे सहभागी होता.

    3. मोहम्मद युसूफ अझहर : हा जैशचा दहशतवादी उस्ताद आणि मोहम्मद सलीम या नावांनीही ओळखला जात असे. तो मसूद अझहरचा मोठा मेव्हणा होता. अझहर जैशच्या मदरशात शस्त्रास्त्र प्रशिक्षण देत असे. जम्मूमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये अझहरचा सहभाग होता. मोहम्मद युसूफ अझहर हा कंधार विमानतळावर झालेल्या IC 814 विमानाचे अपहरण प्रकरणात वॉन्टेड होता. या अपहरणाचा मोहम्मद युसूफ अझहर हा मास्टर माईंड होता.

    4. खालिद उर्फ अबू आकाश : लष्कर-ए-तोयबाचा हा दहशतवादी अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रे पुरवत असे. ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी तो त्याच्या घरात झोपला होता. खालिदवर जम्मूमध्ये दहशत पसरवण्याचा आरोप होता. खालिदचा अंत्यसंस्कार फैसलाबाद येथे झाला, जिथे पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते.

    5. मोहम्मद हसन खान : हा जैशचा दहशतवादी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्याने यापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

     

     

    Operation Sindoor
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    सोनम वांगचुक यांच्या पत्नीची थेट दिल्ली हायकोर्टात धाव

    July 19, 2026

    हिमाचल प्रदेशसह जम्मू काश्मीर मध्ये महाभयंकर तांडव!

    July 19, 2026

    सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif